Goa Ivermectin Scam: विरोधकांचा बीजेपी सरकारवर हल्ला बोल

Goa Ivermectin Scam: विरोधकांचा बीजेपी सरकारवर हल्ला बोल
Goa Ivermectin Scam

पणजी: Goa Ivermectin Scam आयव्हर्मेक्टिन(Ivermectin) गोळ्या खरेदीत भ्रष्टाचार(Scam) झाल्याचे ‘गोमन्तक’ ने उघड केल्यानंतर याप्रकरणी राज्यातील विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रत्येक विरोधी पक्षाला गोळ्या खरेदीत घोटाळा झाल्याचे वाटते. या विषयीचे सत्य जनतेसमोर यायला हवे. सरकारने कोणाच्या सल्ल्यावरून या गोळ्यांची खरेदी केली आणि गोळ्यांचे दर वेगळे कसे, हे स्पष्ट करावे, अशी विचारणाही त्यांनी केली. (Goa Ivermectin Scam Opposition leaders in Goa have questioned the BJP government over the ivermectin issue)

1 मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले, की कोविड काळात सरकारने गोळ्या कोणत्या दराला खरेदी केली, कोणाकडून केली, किती रक्कम अदा केली, किती रक्कम अदा करायची आहे, याची माहिती जनतेला द्यावी. सरकारने याविषयी श्वेतपत्रिका जारी करावी.

2 विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, मध्यंतरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या गोळ्या विकत घेतल्या नाहीत असे सांगितले होते. मात्र आता या गोळ्या अव्वाच्या सव्वा किमतीने विकत घेतल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. या गोळ्या कुणी घेतल्या, का घेतल्या, त्या कुणाला वाटल्या, याचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. 

3 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा म्हणाले, या गोळ्यांबाबत नेमकी माहिती जनतेला दिली पाहिजे. गोळ्यांना जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्याचे पुढे आल्यानंतर केंद्र सरकारने त्या उपचार पद्धतीतून मागे घेतल्या. अशा गोळ्या खरेदी केल्या की केल्या नाहीत याबाबत सरकार माहिती दडवत आहे.

4 आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, अशा मान्यता नसलेल्या गोळ्या खरेदी करून जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा परवाना सरकारला कोणी दिला. एकाच गोळीसाठी विविध दर दिले याचा अर्थ घोटाळा झाला आहे.

5 शिवसेनेचे राज्य प्रमुख जितेश कामत म्हणाले, की या गोळ्यांच्या खरेदीत निश्चितपणे घोटाळा झाला आहे. राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना भाजपवाले त्यांना घोटाळेबाज संबोधायचे. तेच आता भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे घोटाळे होणे हे नैसर्गिक आहे. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com