Goa: जे. पी. नड्डा यांचा आज मंगेशी दौरा

भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) रविवारी सकाळी मंगेशी (Mangueshi, Goa) येथे जाऊन श्री देव मंगेशाचे दर्शन घेणार आहेत.
Goa: जे. पी. नड्डा यांचा आज मंगेशी दौरा
Goa: J. P. NaddaTwitter/@JPNadda

पणजी : भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) सकाळी मंगेशी (Mangeshi, Goa) येथे जाऊन श्री देव मंगेशाचे दर्शन घेणार आहेत. तेथे ते साडेआठ वाजता पोचतील. काही मोजक्या नेत्यांसह हा त्यांचा दौरा असेल. मंगेशीहून परतताना ते सकाळी सव्वानऊ वाजता वृक्षारोपण करतील व ब्रह्मेशानंद स्‍वामी यांची सदिच्छा भेट घेतील. बोक द व्हाक येथे पावणेअकरा वाजता पोचून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम श्रवण करतील. यावेळी पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ते पक्षाच्या प्रदेश गाभा समितीची बैठक घेणार आहेत. पत्रकारांशी सव्वातीन वाजता संवाद साधल्यानंतर ते सायंकाळी साडेचार वाजता दिल्लीला जाण्यास रवाना होणार आहेत.

Goa: J. P. Nadda
Goa:कोसळधार पर्जन्यवृष्टीमुळे डिचोलीत हाहाकार

दरम्‍यान, नड्डा यांचे उद्या गोव्यात आगमन होणार आहे. ते उद्या प्रदेश पदाधिकारी, विविध मोर्चांचे पदाधिकारी, आमदार, मंत्री यांच्या विधानसभा निवडणूक तयारीच्या आढाव्याच्या दृष्‍टिकोनातून बैठका घेणार आहेत. रात्री मुख्यमंत्री व प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्यांवर ते चर्चा करणार आहेत. प्रत्‍येक मतदारसंघाचा राजकीय लेखाजोखा भाजपने तटस्थ यंत्रणेकडून तयार करवून घेतला आहे. त्याआधारे ही चर्चा होईल अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

Goa: J. P. Nadda
Goa: अंजुणे धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात; चारही दरवाजे खुले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com