Goa: पत्रकारांचा मांद्रेच्या विकासाला मोठा हातभार : आमदार दयानंद सोपटे

पत्रकारांचा विकासालाही मोठा हातभार असल्याचे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकारांचा गौरवानंतर केले Goa Goa
Goa: पत्रकारांचा मांद्रेच्या विकासाला
मोठा हातभार : आमदार दयानंद सोपटे
MLA Dayanand Sopte and Journlists present at the reception GoaDainik Gomantkat

मोरजी: कोरोना काळात जीवाची पर्वा न करता पेडणे तालुक्यातील पत्रकारांनी आपले कार्य अखंडित चालू ठेवले. कोरोनाविषयी वृत्त (News) सविस्तर देणे, कोरोनाचा पाठपुरावा करत असतानाच लोकप्रतिनिधी चुकत असेल त्याठिकाणी आवाज उठवणे तसेच समस्या सरकारच्या निदर्शनात आणत असताना मांद्रे (Mandrem) मतदार संघाच्या विकासालाही मोठा हातभार लावला असल्याचे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte)यांनी मांद्रे भाजपातर्फे पेडणे तालुक्यातील पत्रकारांचा गौरवानंतर केले.

MLA Dayanand Sopte and Journlists present at the reception Goa
Goa: पेडणेतील दुसऱ्याही पोर्तुगीज काळातील पूलाला धोका कायम

मांद्रे येथे रविवारी (ता.१८) आयोजित कार्यक्रमात आमदार दयांनद सोपटे बोलत होते. यावेळी मांद्रे मतदार संघ भाजप (BJP) निरीक्षक गोरख मांद्रेकर उपस्थित होते. यावेळी निवृत्ती शिरोडकर, विठोबा बगळी, मकबूल माळगीमणी, चंद्रहास दाभोलकर, राजेश परब, जयेश नाईक, विनोद मेथर, संदीप कामुलकर, प्रसाद पोळजी, अस्मिता पोळजी आदींचा शाल श्रीफळ पुष्प व भेट वस्तू देवून गौरव केला. यावेळी आमदार सोपटे यांनी बोलताना आगरकर, टिळकपासून ही पत्रकारिता सुरु असून आजही ग्रामीण भागातील पत्रकार (Reporter) अल्प मानधन (Honorarium) घेवून काम करतात मात्र, त्यांच्या समस्या कुणीच समजून घेत नाही. त्यांना त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पेडणेतील (Pernem) पत्रकार जागृत असल्याने विकासालाही गती मिळते. असे ते म्हणाले.

MLA Dayanand Sopte and Journlists present at the reception Goa
Goa: नाविन्यपूर्ण कलेला प्राधान्य: बिंदिया भानुदास गवंडी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com