गोवा: आमदार अपात्रता प्रकरणी 20 एप्रिलला होणार निवाडा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

१२ आमदार अपात्रता प्रकरणी आता २० एप्रिल रोजी निवाडा देण्याची वेळ सभापती राजेश पाटणेकर यांच्यावर आली आहे.

१२ आमदार अपात्रता प्रकरणी आता २० एप्रिल रोजी निवाडा देण्याची वेळ सभापती राजेश पाटणेकर यांच्यावर आली आहे. सभापतींनी याप्रकरणी 29 एप्रिल रोजी निवाडा देऊ असे काल ठरवलेले होते. काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले 10 आणि मगोतून भाजपमध्ये गेले दोघे असे मिळून बारा आमदारांच्या विरोधात दोन अपात्रता याचिका 20 महिन्यांपूर्वी सभापतींना समोर सादर झाल्या होत्या. त्या याचिकांवर सभापती निर्णय घेत नसल्याने गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यांच्या याचिकेवरील मागील सुनावणीवेळी 26 फेब्रुवारी रोजी सभापती निवाडा देतील असे सर्वोच्च न्यायालयाला ॲटर्नी जनरलांनी सांगितले होते व ती तारीख न्यायालयाने मान्य केली होती. आज या दोन्ही याचिकांवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा सभापती कडून 29 एप्रिल नवी तारीख पुढे करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली नाही 20 एप्रिल पर्यंत सवती निवाडा देऊ शकतील काय अशी विचारणा न्यायालयाने केली.सभापतींकडून 20 एप्रिल पर्यंत निवडा देण्यात येईल असे सांगितल्यानंतर 21 एप्रिल रोजी पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे. (Goa Judgment in MLA disqualification case to be held on April 20)

गोवा भाजप नेते तथा कार्यकर्त्यांच्या घरावर फडकले पक्षाचे झेंडे

नीळकंठ हळर्णकर, आतानासीओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, अंतोनिओ फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, क्लाफासिओ डायस, इजिदोर फर्नांडिस, चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगावकर आणि दिपक प्रभू पाऊसकर या आमदारानी आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केल्याने सभापतींसमोर त्यांच्या विरोधात चोडणकर आणि ढवळीकर यांनी अपात्रता याचिका सादर केल्या आहेत.  गेल्या वीस महिन्यात सभापतींनी त्यावर निर्णय घेतलेला नाही.

संबंधित बातम्या