Goa News: कदंबला दीड कोटी नफा; तर 255 कोटींची तूट!

Goa News: बसेस नादुरुस्त होण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली असून, रस्‍त्‍यावरच बस बंद पडता आहेत.
Goa News | Kadamba Bus
Goa News | Kadamba BusDainik Gomantak

Goa News: राज्यात कदंब वाहतूक महामंडळ स्थापन होऊन 42 वर्षे उलटली तरी महामंडळाची वाटचाल तशी सुधारलेली नाही. कदंबच्या बसेस रस्त्यावरच नादुरुस्त होण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण खूपच वाढले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात दहा हजार किलोमीटरमागे कदंब बसेस रस्त्यावर नादुरुस्त होण्याचे प्रमाण 0.38 होते.

दरम्‍यान, महामंडळाने मागील आर्थिक वर्षात दीड कोटी रुपये नफा मिळविला असला तरी गेल्या अनेक वर्षांची तूट 255 कोटी आहे. कदंब महामंडळाचा उत्पादनापेक्षा खर्चच अधिक होत आहे. त्यात सुधारणा करण्याचे व्यवस्थापनाकडून प्रयत्न होत असूनही त्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही.

Goa News | Kadamba Bus
Goa Crime : राज्यात सिलिंडरमधून गॅस चोरणारे सक्रिय

2017-18 साली महामंडळाचे उत्पादन 169.68 कोटी रुपये होते, तर 2021-22 या आर्थिक वर्षात ते 195.66 कोटींवर पोहोचले आहे. उत्पादनात वाढ होत झाली असली तरी खर्चातही वाढ झालेली आहे. 2017-18 साली 180.19 कोटी रुपये महामंडळाने खर्च केला होता, तो यावर्षी 2021-22 या आर्थिक वर्षात 194.19 कोटी झाला आहे. दीड कोटी रुपये नफा असला तरी हे प्रमाण खूपच कमी आहे.

कदंब बसेस अपघातांचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. 2017-18 साली प्रतिएक लाख किलोमीटर मागे अपघातांचे प्रमाण 0.26 टक्के होते ते 2021-22 या वर्षात 0.15 टक्के झाले आहे. यावरून कदंब बसेसना अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे स्‍पष्‍ट होते.

Goa News | Kadamba Bus
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या किमतीत किंचित घट; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

सध्‍या ४९८ बसेस कार्यरत

  • कदंब महामंडळाने आतापर्यंत 1334 बसेस खरेदी केल्या आहेत. त्यातील 836 बसेस जुन्या झाल्याने त्या निकालात काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या व मिनी बसेसचा समावेश आहे. सध्या महामंडळाच्या 498 बसेस रस्त्यावर धावत असून त्‍यात केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या 100 इलेक्ट्रिक बसेसचाही समावेश आहे.

  • मोठ्या कदंब बसेस 1984 पर्यंत राज्यात धावत होत्या. मात्र गावातून सेवा देण्यासाठी सुरुवातीला चार मिनीबसेस सुरू करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महामंडळाने 1997 साली 15 मिनीबसेस सुरू केल्या.

Goa News | Kadamba Bus
CM Pramod Sawant : ड्रग्जमुक्तीसाठी कठोर कारवाई; गोवा पोलिसांना निर्देश
  • महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस पणजी-मडगाव, पणजी-वास्को या मार्गावर धावत आहेत. या बसेस आता राष्ट्रीय महामार्गाव्यतिरिक्त फोंडा व म्हापसा या मार्गावरही सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे.

महामंडळाचे उत्पादन व खर्च रु. लाखात तसेच वर्ष उत्पादन आणि खर्च

(2017-18, 16,968, 18,072) (2018-19, 20,098, 22,386) (2019-20, 20,481, 21,749) (2020-21, 15,080, 15,847) (2021-22, 19,566, 19,419)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com