‘कदंब’ची कर्नाटकातील आंतरराज्‍य वाहतूक सुरू

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे अजून तेथे मात्र कदंबने बसेस सुरू केलेल्‍या नाहीत.
‘कदंब’ची कर्नाटकातील आंतरराज्‍य वाहतूक सुरू
कदंब बस गोवाDainik Gomantak

पणजी : कर्नाटक (karnataka) एसटी (ST) महामंडळाने आपल्या अनेक बसेस (Bus) गोव्यात (Goa) पाठवल्यानंतर कदंब महामंडळानेही (Kadamba Transport Corporation) आपल्‍या काही बसेस कर्नाटकात पाठवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे अजून तेथे मात्र कदंबने बसेस सुरू केलेल्‍या नाहीत. तसेच महाराष्ट्रातून गोव्यात ये-जा करणाऱ्या बसेसही बंदच आहेत. (Goa Kadamba Transport Corporation has started sending its buses to Karnataka)

कदंब बस गोवा
Goa Curfew: संचारबंदीत वाढ; बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंट रात्री 11 पर्यंत खुले

कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकाच्या सुमारे 10 ते 15 बसेस गोव्यात गेल्या काही दिवसांपासून ये-जा करत आहेत. पणजी, वास्को, मडगाव व म्हापसा या शहरांत या बसेस येतात. त्‍यानंतर कदंब महामंडळानेही चार दिवसांपूर्वी दोन बसेस कर्नाटकात पाठवल्या होत्या.

कदंब बस गोवा
Goa Rape Case: रघुपती राघव राजाराम, प्रमोदाक सद्‍बुध्दी दे भगवान

त्यात आजपासून आणखी चार बसेस वाढवल्‍या आहेत. बेळगाव, हुबळी, सौंदत्ती येथे जाण्‍यासाठी या बसेस पणजी व मडगाव येथून सुटतात. गोव्यात येताना तेथील बसस्थानकावरच कदंबचे वाहक कोरोना नेगेटिव्ह प्रमाणपत्राची तपासणी करतात आणि नंतरच बसमध्ये प्रवेश देतात. एखाद्या व्यक्तीला तातडीने गोव्यात यायचे असेल तर सीमेवर 270 रुपये खर्च करुन अँटिजन चाचणी करुन घ्यावी लागेल असे सांगून बसमध्ये त्याला प्रवेश दिला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com