Goa: राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत वास्कोत कारगिल विजय दिवस साजरा

श्री. राजेंद्र आर्लेकर हे गोव्याचे सुपुत्र तथा हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh Governor) नवनिर्वाचित राज्यपाल (Goa)
Goa: राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत वास्कोत कारगिल विजय दिवस साजरा
Mr. Arlekar while offering a wreath to the martyr's memorial, in Vasco -Goa. on Monday, 26 July, 2021.Pradeep Naik / Dainik Gomantak

भारत देशासाठी (India) ज्या शहींदानी, हुतात्म्यांनी (Martyrs) , सैनिकांनी (Soldiers) प्राणांची आहुती (Sacrifice) दिली त्यांची आठवण करणे आम्हा देशवासीयांचे परम कर्तव्य आहे. देशाचे रक्षण करणे, हे प्रत्येक तरुणांचे कर्तव्य असून हा देश माझा आहे. आमच्या देशावर आमचे जे राष्ट्रप्रेम आहे ते टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोव्याचे सुपुत्र तथा हिमाचल प्रदेशचे राज्यपाल (Himachal Pradesh Governor) श्री. राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी केले. (Goa)

Mr. Arlekar with the citizens gathered on the occasion of Kargil Victory Day, on 26 July, 2021
Mr. Arlekar with the citizens gathered on the occasion of Kargil Victory Day, on 26 July, 2021Pradeep Naik / Dainik Gomantak

कारगिल विजय दिनाच्या (Kargil Victory Day) निमित्ताने माजी सैनिक कल्याण संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्री आर्लेकर यांनी कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत वास्कोचे आमदार कार्लुस अल्मेदा, अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेचे कोकण प्रांत संघटन मंत्री अनंत जोशी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण गोवा जिल्हा संयोजक संकल्प फळदेसाई तसेच परिषदेचे विद्यार्थी, भाजपचे वास्को गटाध्यक्ष दीपक नाईक, युवा अध्यक्ष गौरीश नाईक, संतोष केरकर, संदीप नार्वेकर, उमेश साळगावकर, श्रध्दा महाले व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष जोशी यांच्यासह कारगिल युद्धातील सहभागी अधिकारी व सैनिक उपस्थित होते. उपस्थितांनी हुतात्मा स्मारकाला पुष्प वाहून कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला.

Mr. Arlekar while offering a wreath to the martyr's memorial, in Vasco -Goa. on Monday, 26 July, 2021.
हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर गोव्यात

पुढे श्री आर्लेकर म्हणाले की, आम्ही देशासाठी काहीतरी केले पाहिजे याची उजळणी करावयास हा दिवस साजरा करण्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. कारगिल विजय दिवस हा सैनिकांच्या शौर्याच्या आधारावर मिळाला असल्याने कारगिल दिवसाचे आम्हाला फार महत्त्व असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com