Karvi Strobilanthes Callosa Blossom In Goa: सात वर्षानंतर बहरली जांभळी निळी ‘कारवी’

शिगावात पुष्पोत्सव
Karvi
Karvi Dainik Gomantak

Karvi Strobilanthes Callosa Blossom In Goa भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीच्या सणाचे स्वागत करण्यासाठी जणुकाही सह्याद्रीतल्या पर्वत रांगात विसावलेल्या धारबांदोडा तालुक्यातल्या दूधसागर नदी किनारी वसलेल्या निसर्ग सुंदर अशा शिगावात सात वर्षांनंतर फुलणाऱ्या कारवीच्या निळ्या-जांभळ्या फुलांचा आविष्कार पहायला मिळत आहे.

स्ट्रोबीलेन्थस केंलोसस या नावाने वनस्पती शास्त्रात परिचित असणारी ही कारवीची प्रजाती, दर सात वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालखंडानंतर जेव्हा सह्याद्रीच्या पर्वत रांगात आणि त्यांच्या संलग्न प्रदेशात फुलायला लागते.

तेव्हा कृमीकीटकांच्या विविध प्रजाती आणि रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवे स्वच्छंदपणे निळ्या - जांभळ्या फुलात दडलेल्या मधुरसाचा आस्वाद घेण्यासाठी भिरभिरू लागतात.

निसर्गातला हा पुष्पोत्सव खरंतर डोंगर कपारीत आणि पायथ्याशी वसलेल्या गावात जेव्हा मान्सूनच्या पावसाळी मौसमात सुरू होतो, तेव्हा आदिवासी आणि जंगलनिवासी सुखावतात, कारण त्याबरोबरच मधमाशा घोटींग, माडत, किंदळ अशा महाकाय वृक्षांच्या फांद्यावरती माधुर्यपूर्ण गोडव्याचा खजिना असणारे पोळे तयार करतात आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी रानातल्या अस्वलांबरोबर तेथील जनजाती स्पर्धा करु लागतात.

Karvi
Goa Honey Trap Case: कळंगुट-कोलवाळ पोलिसांकडील हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक

निळा-जांभळा रंगोत्सव

शिगाव -कुळे जैवविविधता व्यवस्थापन मंडळाने रानटी भाज्यांच्या महोत्सवाचे आयोजन सरकारी हायस्कूल शिगाव येथे केले होते. त्यावेळी कारवीच्या फुलांचा उपयोग जसा सजावटीसह गुंजन शिगावकर यांनी नैसर्गिक पर्णफुलांचा कल्पकपणे उपयोग रांगोळीत केला होता.

तर महिलांनी गजरे केले होते. यावेळी गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी शिगाव -कुळे येथील नैसर्गिक सांस्कृतिक आणि पुरातत्‍वीय संचितांचे दर्शन देशी-विदेशी पर्यटकांना येथे घडवण्यासाठी महामंडळातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही दिली.

दर सात वर्षांनंतर कारवीच्या झुडपांना आनंदाचे जे उधाण येते. त्याचे रुपांतर निळ्या - जांभळ्या रंगोत्सवात होते.

अनुपम बहर अनुभवला!

माटोजे येथील महादेव गणेश सावंत, 75 वर्षांच्या कष्टकऱ्याने आपल्या आयुष्यात नऊ वेळा तरी कार्वीच्या झुडुपांना आलेल्या निळ्या - जांभळ्या फुलांचा अनुपम बहर अनुभवलेला आहे.

त्यांच्या शब्दात सांगायचे, तर कारवी फुलातल्या मधाचा आस्वाद घेणाऱ्या मधमाशा महाकाय वृक्षांवरी मधाची मोठी पोळी तयार करतात.

पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने युक्त असणारे हे मध चाखण्यासाठी आम्ही रात्रीच्या अंधारात पूर्वी मशाली पेटवून जायचो आणि हा मधुरसाचा ठेवा अनुभवायचो.

राजेंद्र पा. केरकर

Karvi
Ponda News: फोंड्यात 'भारत स्वच्छता'अंतर्गत लोकसहभागातून मोहीम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com