Goa: बाणावली अपघातात खारेबांधचा युवक ठार
Khareband youth death in Benaulim accidentDainik Gomanatak

Goa: बाणावली अपघातात खारेबांधचा युवक ठार

दांडो मैदानाजवळ चारचाकी पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार हनुमंत याला चारचाकीने जोरदार धडक दिली

सासष्टी: बाणावली येथे काल रात्री उशिरा दुचाकी आणि चारचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हनुमंत हरिजन (22, रा. खारेबांध-मडगाव) या युवकाचे निधन झाले. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

कोलवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 11.35 वाजता बाणावली येथील दांडो मैदानाजवळ हा अपघात झाला. दांडो मैदानाजवळ चारचाकी पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार हनुमंत याला चारचाकीने जोरदार धडक दिली. धडक बसताच, हनुमंत रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.

Khareband youth death in Benaulim accident
तळ्यात उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

हनुमंतला जखमी अवस्थेत मडगावमधील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी चारचाकी चालकाविरुद्ध भा. दं. सं.च्या 279 आणि 304 (A) कलमांन्‍वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी कोलवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.

Khareband youth death in Benaulim accident
Goa: बागातील दुर्घटनेनंतर न्हावेलीतील घटनेला उजाळा

बाणावली येथे काल रात्री हा भीषण अपघात झाला. त्यावेळी या अपघाताचा मोठा आवाज ऐकून जवळच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भयानक होता, की चारचाकीच्या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातात दुचाकीस्वाराला जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने इस्पितळात हलविले असता तेथे त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com