Goa: कोकण मराठी साहित्य परिषद नेमकी कोणाची?

Goa: कोकण मराठी साहित्य परिषदेमधील खरी संस्था नेमकी कोणाची यावर धुसफुस सुरु झाली आहे.
Goa | Adv. Ramakant Khalap
Goa | Adv. Ramakant KhalapDainik Gomantak

Goa: कोकण मराठी साहित्य परिषदेमधील वाद आता परत एकदा चव्हाट्यावर आला असून खरी संस्था नेमकी कोणाची यावर धुसफुस सुरू झाली आहे. शनिवार 15 रोजी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझामध्ये विष्णू वाघ यांच्या समग्र साहित्यावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजक कोकण मराठी साहित्य परिषद आहे. त्याचा आपल्याशी काहीच संबंध नसल्याचे या परिषदेचे सल्लागार समिती अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप यांनी स्पष्ट केले. खलप पुढे म्हणाले, सुदेश आर्लेकर यांनी हवे तर कोकण (Kokan) मराठी साहित्य परिषद (आर्लेकर) अशी संस्था स्थापन करावी आणि हवी तेवढी प्रसिद्धी मिळवावी, आपली काहीच हरकत नाही.

Goa | Adv. Ramakant Khalap
Goa News: गोव्याच्या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा आणि CM प्रमोद सावंत यांच्यात दिल्लीत बैठका

आपलीच परिषद खरी असा दावा आर्लेकर यांचा आहे. शिवसेनेची जशी विभागणी न्यायालयाने केली, तशी विभागणी झाली, तरच हा वाद मिटण्याची शक्यता आहे. संस्थेचे नाव एक मात्र अध्यक्ष दोन आणि विशेष म्हणजे दोन्ही संस्थांची नोंदणी सरकार दरबारी झालेली आहे.

मुदत संपल्यावर फेरनूतनीकरण व्हायला हवे होते, ते दोन्ही संस्थांचे झालेले नसल्यामुळे दोन्ही संस्था अधिकृतरीत्या बेकायदेशीर आहेत. या दोन्ही संस्था कुठलाच कार्यक्रमही आयोजित करू शकत नाहीत, सरकार (Government) त्यांना मदत करू शकत नाही. तरी पण भरमसाठ मदत झालेली दिसते. बॅंक खाते, मिनिट बुक व इतर आपलेच खरे असा दोघांचाही दावा आहे.

Goa | Adv. Ramakant Khalap
Goa News: पणजीत 'तरंगती जेटी' अन् हायब्रीड फेरीबोटीचे अनावरण!

ॲड. रमाकांत खलप-

साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या सोबत आपण सुरुवातीपासून होतो. माझीच संस्था मूळची आहे. मी कोमपचा संस्थापक अध्यक्ष आहे. ज्या संस्थेत प्रवेश करायचा, त्याचे दोन तुकडे करायचे आणि वाट लावायची, हा प्रकार आता त्यांनी सोडून द्यायला हवा.

सुदेश आर्लेकर-

रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांना कायदा माहीत नाही काय? त्यांची संस्था खोटी आहे. 10 वर्षांपूर्वी एकाच संस्थेच्या दोन संस्था झाल्या, पण आजपर्यंत आपण सरकारकडून काहीच मदत घेतलेली नाही. आपल्याकडे 50 सदस्य आहेत. खलपांनी आपले सदस्य जाहीर करावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com