Dudhsagar Falls: यंदा जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्याला फक्त '44' हजार पर्यटकांची भेट

Dudhsagar Falls: 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दुधसागर धबधब्याला 44 हजार 300 पर्यटकांनी भेट दिली.
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak

Dudhsagar Falls: जगप्रसिद्ध असलेल्या कुळे दूधसागर धबधब्याला पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून 21 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत 44,300 पर्यटकांनी दूधसागर धबधब्याला भेट दिली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांकडून कुळे शिगाव पंचायत लाईफ जॅकेट मागे प्रत्येकी 40 रुपये आकारते. त्यातून कुळे शिगाव पंचायत मालामाल झाली असून 17,72 हजार रुपये पंचायतीच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

मात्र, जीप मालकांनी गतवर्षीपेक्षा यंदा पर्यटक कमी प्रमाणात आल्याने आम्हाला जास्त नफा न होता नुकसानीत जावे लागल्याचे सांगितले. पूर्वी दिवाळीच्या सुट्टीत संबंधित वन खाते जीप गाड्या 240 वरून 300 करायचे. त्यामुळे पर्यटकही मोठ्या प्रमाणात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येत होते. पण यंदा दिवाळी सुट्टीत जीपसंख्या वन खात्याने न वाढविल्याने दर दिवसाला 240 जीप गाड्या दूधसागरला जातात. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

Dudhsagar Falls
Demolished Temples In Goa: पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी अनेक अर्ज प्राप्त...

पंचायतीला 13 लाखांचा निव्वळ नफा

2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत दुधसागर धबधब्याला 44 हजार 300 पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे जीप असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याला नफा झालेला आहे. त्यामधून जॅकेट देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खर्च जॅकेट मागे प्रत्येकी 10 रुपयांप्रमाणे 4,43 हजार रुपये वजा केल्यास कुळे शिगाव पंचायतीच्या निधीत निव्वळ 13,29 हजार रु. नफा प्राप्त झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com