Vasco बाजारात वृक्ष कोसळल्याने वाहनांचे झाले मोठे नुकसान; जीवितहानी टळली

आज सकाळी 11:40 वाजता येथील जुन्या भाजी मार्केट (Vasco market) समोर एक भलेमोठा वृक्ष मुळापासून उन्मळून पडला.
Vasco बाजारात वृक्ष कोसळल्याने वाहनांचे झाले मोठे नुकसान; जीवितहानी टळली
Vasco marketDainik Gomantak

वास्को बाजारात (Vasco market) एक भलेमोठे जुनाट वृक्ष कोसळून दोन चारचाकी व पाच दुचाक्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुर्दैवाने मोठी जीवितहानी टळली. तर वीज खात्याचेही नुकसान झाले. आज सकाळी 11:40 वाजता येथील जुन्या भाजी मार्केट समोर एक भलेमोठा वृक्ष मुळापासून उन्मळून पडला. सदर वृक्ष येथे पार्क करून ठेवलेल्या दोन चार चाकी वाहनावर तर पाच दुचाक्यावर पडल्याने या वाहनांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, तसेच येथे असलेल्या वीज वाहिनीवर सदर वृक्ष पडून वीज वाहिन्या तुटून पडल्या व वीज खांबाचे नुकसान झाले.दरम्यान आज रविवार असल्याने या मार्केट परिसरात लोकांची तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. येथे व्यापारी रस्त्याच्या कडेला बसून आपला व्यवहार करतात. सुदैवाने आजही वर्दळ होती. तसेच उपस्थित व्यापाऱ्यांनी तसेच लोकांनी सदर वृक्ष कोसळताच धाव घेतली. त्यामुळे देव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. तर वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वित्तहानीला सामोरे जावे लागले.

Vasco market
राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल

दरम्यान दोन दिवसानंतर या ठिकाणी गणेश चतुर्थी निमित्त माटोळीचा बाजार भरणार असून या ठिकाणी सुमारे 50 हून अधिक व्यापारी आपला व्यवसाय थाटतात. जर आजचा हा प्रसंग माटोळी बाजारावेळी घडला असता तर मोठा हाहाकार माजला असता. या ठिकाणी माटोळी चे सामान खरेदीसाठी शेकडो लोकांची वर्दळ असते. दैव बलवत्तर हा प्रसंग इतक्यावरच निभावला अशा लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान सदर घटना घडली असता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून आले व वृक्ष कापून अडथळा दूर केला. यावेळी नगरसेविका शमी साळकर (Shami Salkar) व माजी नगरसेवक कृष्णा साळकर (Krishna Salkar) यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या प्रसंगावर कृष्णा साळकर यांनी मुरगाव पालिकेवर निशाना करताना, वास्को शहरात जवळजवळ ३० हून अधिक दुर्मिळ झालेले वृक्ष असून ते कोणत्याही क्षणात पडण्याच्या मार्गावर आहे. आपण याविषयी मुरगाव पालिकेला पत्र लिहून कळवले, पण आजपर्यंत पालिकेने यावर दुर्लक्ष केल्याने आज ही परिस्थिती उद्भवत असल्याचे ते म्हणाले.

Vasco market
गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सोहळ्यासाठी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

आपण शहरातील दुर्मिळ झालेल्या झाडाविषयी पालिकेला कळवले असताना सुद्धा पालिकेने कानाडोळा केला आहे. तसेच सध्याचे पालिका मंडळ सुस्त असून त्यांनीही या झाडावर लक्ष देणे सोईस्कर समजले नाही. पालिकेकडे सध्याच्या परिस्थितीत कट्टर नाही, तसेच इतर आपत्कालीन वेळेवर लागणारे सामानही नाही. आपण खाजगी कटर तसेच लागणारे साहित्य व क्रेन घेऊन ही झाडे ट्रीम करण्याची परवानगी मागितली. तरी पालिका सदर परवानगी देण्यास टाळाटाळ करतात असे साळकर म्हणाले. सध्या ३०हून अधिक झाडे डेंजर झोनमध्ये आहे. ती झाडे केव्हाही उन्मळून पडू शकतात. आणखी कोणताही प्रसंग घडला तर पालिका याला जबाबदार असणार असे घडले तर पालिकेवर तक्रार दाखल करण्यास मागेपुढे पाहणार नाही असे साळकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com