Goa: कारवार हमरस्त्यावर नगर्से येथे मोठा खड्डा
कारवार हमरस्त्यावर नगर्से येथे पडलेला मोठा खड्डा (Canacona Goa) Dainik Gomantak

Goa: कारवार हमरस्त्यावर नगर्से येथे मोठा खड्डा

चापोली ते गुळे मडगाव कारवार हमरस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची पार दूरावस्था

Goa: काणकोण पालिका (Canacona Municipality) क्षेत्र व आगोंद पंचायत क्षेत्रातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पालिका क्षेत्रातील नगर्से येथून चापोली धरणाकडे जाणाऱ्या व चापोली ते गुळे मडगाव कारवार हमरस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची पार दूरावस्था (Road Damage) झाली आहे. गेली दहा वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. चापोली ते नगर्से येथे नवीन जलवाहिनी घालताना रस्ता खणावा लागला, हे समजून घेण्यासारखे आहे. मात्र सलग दोन वर्षे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही ही ठेकेदाराची बेजबाबदारी आहे,

कारवार हमरस्त्यावर नगर्से येथे पडलेला मोठा खड्डा (Canacona Goa)
Goa: विदेशी पर्यटक लागलेत कचरा गोळा करण्याच्या कमाला...

मडगाव कारवार हमरस्त्यावर रेल्वे मार्ग उड्डाण पूलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. येथील रहिवाशानी धोका टाळण्यासाठी खड्डयाभोवती झाडाच्या फांद्या लावल्या आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नगर्सेचे नगरसेवक हेमंत कुमार नाईक गावकर यांनी सांगितले. याविषयीची कैफीयत त्यानी सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमा प्रसंगी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती.

Related Stories

No stories found.