Goa: पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब कर्यान्वित

प्रलंबित प्रकरणाच्या तपासकामाला मिळणार गती
Goa: पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब कर्यान्वित
Cyber Forensics Dainik Gomantak

Panaji: डिजीटल जगात (Digital World) गेल्या काही वर्षात सायबर गुन्हे (Cyber Crime) वाढत आहेत. अशावेळी गुन्ह्यांचा तपासकामासाठी ज्या सायबर फॉरेन्सिक लॅबची आवश्‍यकता होती ती आता रायबंदर येथील (Ribandar - Goa) सायबर गुन्हे कक्षात कार्यान्वित झाली आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तपासकामाला गती मिळणार आहे. या कक्षामधील पोलिस अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सीआयडी क्राईम ब्रँचचा अतिरिक्त ताबा असलेले अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

Cyber Forensics
Goa: राज्यात आज कोरोनामुळे एकही बळी नाही

सायबर फॉरेन्सिक्स लॅबरोटरी ही एक अत्याधुनिक, समर्पित सुविधा आहे ज्यामधून विविध डेटा व्यावसायिक व तांत्रिक पद्धतीने शोधून व विश्‍लेषण करणे आता शक्य होणार आहे. या लॅबरोटरीमुळे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे त्वरित संशयितांपर्यंत पोहण्यास मदत मिळणार आहे. या लेबोरेटरीमध्ये एकाचवेळी १६ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. त्यामुळे या लॅबरोटरीचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याचा तपास लावण्यास शक्य होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या लॅबरोटरीचा वापर गुन्हे शोध व तपासासाठी केला जाणार आहे.

Cyber Forensics
Goa: मजूर वीज खांबावरून पडल्यास जबाबदार कोण ?

या लॅबरोटरीच्या मदतीने फॉरेन्सिक तपासकाम तसेच डेटा रिकव्हरी पद्धतीने त्याचा वापर करता येणार आहे. लॅबरोटरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मोबाईल, कम्प्युटर व हार्ड डिस्क याची सखोल माहिती मिळवण्यास मदत होणार आहे. विविध प्रकार पद्धतीने तपासकाम करण्याची संधी तसेच विशेष तंत्रज्ञान पद्धती तसेच मार्गदर्शन या लॅबरोटरीच्या माध्यमातून तपास अधिकाऱ्यांना मिळणार आहे असे सक्सेना यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.