गोव्यातील वकीलांची उच्च न्यायालयात धाव; 15 दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

कालच्या दिवशी राज्यात  71 मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वोच्च-एक दिवसीय मृत्यूची संख्या आहे.

कालच्या दिवशी राज्यात  71 मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वोच्च-एक दिवसीय मृत्यूची संख्या आहे. वकिलांनी बेड आयसीयू (ICU Beds) आणि ऑक्सिजन (Oxygen) उपलब्धतेविषयी ची माहिती एका व्यासपिठावर मिळावी अशी याचिका गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयात मांडली व राज्यात कडक लॉकडाउनची (Lockdown) अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली. उच्च न्यायालयात याचिका (PIL) दाखल करणार्‍यांमध्ये अरमांडो गोन्साल्विस (Armando Gonsalves) आणि श्रुती चतुर्वेदी तसेच गोवा फॉरवर्ड पार्टीचे (Goa Forward Party) उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांचा समावेश आहे. या याचिकांवर गुरुवारी कोर्टाकडून सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयासमोर याचिकाकर्त्यांनी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाउन लादण्यासाठी तसेच गोव्याला येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल (RT-PCR) निगेटिव्ह असणे बंधनकारक करण्याचे निर्देशही न्यायालयाला दिले आहेत. (Goa lawyers rush to high court; Demand for 15 days lockdown)

Third Wave of Corona: गोवा सरकारने GAD कर्मचार्‍यांना सद्गुरुंच्या योग...

गोन्साल्विस आणि चतुर्वेदी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये मालदीवच्या पर्यटन स्थळाचे उदाहरण दिले आहे. तसेच मालदीवला येणाऱ्या प्रत्येकाला  आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह असण्याची मागणी करत आहेत. कामत यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की गेल्या काही दिवसांत गोव्यातील पॉझिटिव्हिटी रेट 50 टक्क्यांपर्यंत दिसून आला आहे त्यामुळे कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करावा. बुधवारपर्यंत गोव्यातील सक्रिय रुग्णसंख्या 27,964 झाली असून त्यातील 3,496 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांच्या तुलनेत दहा पट वाढ झाली आहे आणि बुधवारी सर्वात जास्त एक दिवसीय मृत्यूंची नोंद झाली आहे.राज्य सरकारने यापूर्वी  चार दिवसांचा लॉकडाउन लावला होता, तेव्हापासून सरकारने कित्येक कामांवर फक्त निर्बंध लावले आहेत.

जीएफपी अध्यक्ष विजयी सरदेसाई (Vijai Sardesai) म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन हा शब्द उच्चारण्याचीही इच्छा नाही. गोव्यात कोरोना आपत्ती बनत आहे. राज्यात सध्या स्वयंघोषित लॉकडाऊन आहे. सरकार अद्याप टीव्ही शोच्या शुटिंगला पैसे कमविण्यासाठी परवानगी देत आहे. शेकडो लोक बिना मास्कचे फिरत आहेत. आम्ही संपूर्ण लॉकडाऊनची मागणी करत आहोत.” बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एक सुपर स्पेशलिटी ब्लॉक सुरू केला, ज्यामध्ये रूग्णांसाठी  150 ऑक्सिजन बेड्स आहेत 20,000 लिटरच्या ऑक्सिजन टाक्या आहेत.

GOA COVID-19: कोरोनाची लागण झालेल्या 638 जणांचा आरोग्य यंत्रणेला पत्ताच नाही

दरम्यान, गोवा सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी केंद्रीय गृहनिर्माण व नगर व्यवहार मंत्रालयाने 15 एप्रिल रोजी सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा एक यूट्यूब व्हिडीओ पाहण्याचा सल्ला गोवा सरकारने बुधवारी दिला. सेक्रेटरी श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येत आणि सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा व्हिडिओ अतिशय शक्तिशाल आहे. ही क्रिया एखाद्याची श्वसन व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि एखाद्याला सध्याच्या संकटांना सकारात्मक मार्गाने सामोरे जाण्यासाठी तयार करते. यासाठी  काही मिनिटांचा वेळ आवश्यक आहे आणि हा योग रिक्त पोट असताना करणे आवश्यक आहे. ”

संबंधित बातम्या