गोव्यातील मुस्लिम बांधवांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न: शेख जीना

Goa Leaders are responsible for reducing the number of Haj pilgrims
Goa Leaders are responsible for reducing the number of Haj pilgrims

सासष्टी: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रियाज व नजीर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम बांधवांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केल्याने यंदा हज यात्रेला जाण्यासाठी २०० पैकी फक्त ३५ लोकांनी नावनोंदणी केली असून यंदा यात्रेकरूंची संख्या कमी होण्यास हे नेते जबाबदार आहेत, असा आरोप अखिल गोवा हज समितीचे अध्यक्ष शेख जीना यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

आणखी वाचा:


तसेच सरकारने याची दखल घेऊन १० जानेवारीपर्यंत नावनोंदणी वेळ वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. जगात थैमान घातलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर साउदी सरकारने यंदा हज यात्रेसाठी देशातून फक्त ३५ हजार यात्रेकरू पाठविण्याची अट घातल्याने देशातील २१ एम्बाकेशन केंद्रापैकी अकरा केंद्रे रद्द करण्यात आलेली असून यामध्ये गोव्यातील केंद्राचाही समावेश आहे. यामुळे गोव्यातील लोकांसाठी मुंबई येथे एम्बाकेशन केंद्राची सुविधा देण्यात येणार आहे. असे असतानाही सत्य न पडताळता गोव्याचे एम्बाकेशन केंद्र रद्द केल्याने या नेत्यांनी गोवा सरकारवर अनेक आरोप केले होते. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळेच यंदाची संख्या कमी झाली आहे, असे शेख जीना यांनी स्पष्ट 
केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com