
राज्यातील आमदारांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेवर गोवा विधानमंडळ सचिवालयाने 24 लाख 96 हजार 500 रूपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षी 27 आणि 28 जून रोजी पणजीतील ताज विवांता येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला होता.
अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी ताज विवांता येथे झालेल्या आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेची माहिती आणि कार्यक्रमावर झालेल्या खर्चाचा संपूर्ण तपशील मागितला होता. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी मुंबईस्थित एनजीओ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेला देण्यात आली होती. आयोजनासाठी एकूण खर्चापैकी 24 लाख 13 हजार 100 रुपये या संस्थेला देण्यात आले आहेत.
तसेच, फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी 80,000 रुपये खर्च करण्यात आले. तर, आमदार उल्हास तुयेकर आणि कृष्णा साळकर यांच्या फोटो फ्रेमासाठी 3400 रुपये खर्च करण्यात आले. अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सहा वक्ते बोलविण्यात आले होते. यामध्ये राजेंद्र आर्लेकर, डॉ. अनंत काळसे, डॉ. हरीश शेट्टी, राम नाईक, देश दीपक वर्मा आणि सतीश महान यांचा समावेश आहे. सहा वक्ते त्यांचा प्रवास, मानधन, भोजन आणि निवास यावर एकूण साडेचार लाख खर्च करण्यात आले.
दोन दिवसांच्या कार्यक्रमात स्टेज सजावट आणि स्मृतीचिन्हांसाठी दोन लाख तर आमदारांच्या चहापानावर पाच लाखांचा खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी ताज विवांता हॉटेला देण्यात आलेल्या भाड्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये देण्यात आलेला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.