Goa Liberation
Goa LiberationDainik Gomantak

Goa Liberation : सहा महत्त्वाच्या शहरांमध्ये होणार गोवा मुक्तीचे सोहळे

गोवा मुक्तीस 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध सोहळ्यांचे आयोजन केले होते

पणजी : गोवा मुक्तीस 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध सोहळ्यांचे आयोजन केले होते. आता अशा प्रकारचे सोहळे देशातील महत्त्वाच्या सहा शहरांमध्ये आयोजिण्यास ९ सप्टेंबरपासून अहमदाबाद येथून प्रारंभ झाला आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत अशा सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे.

Goa Liberation
Goa Politics| माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची भूमिका; खरी कुजबूज!

अहमदाबादनंतर 16 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील सेलिब्रेशन मॉल, देवेंद्र धाम, भुवना येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे, तामिळनाडूमधील मदुराई येथे 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान, केरळमधील तिरुअनंतपूरम येथे 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान आणि म्हैसूर येथे 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान हे सोहळे होणार आहेत.

या सोहळ्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मुक्तीनंतर राज्याने आतापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये बजावलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन करताना खूप आनंद होत आहे आणि अभिमानही वाटत आहे. राज्याने सुशासनाबरोबरच क्रीडा, कला व संस्कृती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य व अन्य क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली आहे.

आज उदयपूरमध्ये गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन

आज, 16 सप्टेंबर रोजी उदयपूरमधील नागरिकांना या सोहळ्यात गोव्याची संस्कृती, संगीत, नृत्य, परंपरा यांचे दर्शन होणार आहे. तसेच क्लिक्स, स्टील हे खास वाद्यवृंद (बॅण्ड) विशेष आकर्षण ठरणार आहे. शिवाय कार्निव्हलमधील किंग मोमोची परेड हे आणखी एक आकर्षण असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com