गोवा मुक्तिदिन सोहळा वर्षभर साजरा करणार: मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोवा षष्ठ्यब्दी मुक्तिदिन सोहळा वर्षभर साजरा केला जाणार आहे. यामध्ये गोव्यातील लोकांना, स्वातंत्र्यसैनिकांना तसेच गोवा मुक्तिदिनाशी संबंधित असलेल्या सर्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. ​

पणजी: गोवा षष्ठ्यब्दी मुक्तिदिन सोहळा वर्षभर साजरा केला जाणार आहे. यामध्ये गोव्यातील लोकांना, स्वातंत्र्यसैनिकांना तसेच गोवा मुक्तिदिनाशी संबंधित असलेल्या सर्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला कोणी विरोध करू नये. सर्व विरोधकांनी सहभागी होण्याची सूचना तसेच विनंती करतो.

राज्यात गोवा मुक्तिदिनाशी संबंधित असलेली अनेक काही स्मृतिस्थळे दुर्लक्षित झाली आहेत. त्यांचा जीणोद्धार तसेच नूतनीकरण करण्याचे काम येत्या वर्षभरात केले जाणार आहे. गोवा मुक्तिदिनाचा पूर्वेतिहास आजच्या नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना दिली. 

‘बीफ’चा तुटवडा भासणार नाही 
कर्नाटकमध्ये ‘बीफ’वर बंदी आणल्याने राज्यात होणारा ‘बीफ’ पुरवठा होत नाही. अनेक ‘बीफ’ विक्रेत्यांना दैनंदिन येणारा पुरवठा बंद झाला आहे. 
त्यामुळे काही बीफ व्यावसायिक काल मला भेटले व त्यांनी आपली समस्या मांडली. पशुसंवर्धन खात्याचा सचिव व संचालकांशी चर्चा करून यासंदर्भात तोडगा काढण्यास सांगितले आहे. ‘बीफ’चा तुटवडा भासू देणार नाही. या व्यावसायिकांसाठी ‘बीफ’ पुरवठ्याचे व्यवस्था केली जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. 

आणखी वाचा:

गोव्यात होणाऱ्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरु -

संबंधित बातम्या