कळंगुट, बागा समुद्रकिनारे बनताहेत धोकादायक

विलास महाडिक 
सोमवार, 10 मे 2021

जगात निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व सुमारे 105 किलोमीटर किनारपट्टी लाभलेल्या गोव्यात लाखोच्या संख्‍येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्राच्या पाण्यात जाण्यास आकर्षण असलेल्या या पर्यटकांना बुडण्यापासून वाचविण्याची बहुमोल कामगिरी ‘दृष्टी लाईफसेव्हिंग’च्या जीवरक्षकांनी केली आहे.

पणजी : जगात निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व सुमारे 105 किलोमीटर किनारपट्टी लाभलेल्या गोव्यात(Goa) लाखोच्या संख्‍येने देशी व विदेशी पर्यटक(Tourist) भेट देतात. समुद्राच्या पाण्यात जाण्यास आकर्षण असलेल्या या पर्यटकांना बुडण्यापासून वाचविण्याची बहुमोल कामगिरी ‘दृष्टी लाईफसेव्हिंग’च्या जीवरक्षकांनी(Lifeguard) केली आहे. 2011 ते 2021 पर्यंत 40 सुमद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी 4168 पर्यटकांना समुद्रात बुडण्यापासून वाचविण्यात यश मिळवले आहे. यावर्षी घडलेल्या 209 घटनांपैकी कळंगुट(Calangute), बागा(Baga), कांदोळी( Candolim) व कोलवा(Colva) समुद्रकिनाऱ्यांवर अर्ध्याहून अधिक (123) घटना घडल्या आहेत. (Goa lifeguards save 4168 tourists life)

Canacona: खोला मिर्चीचे दर हजारीपार 

राज्यात 2007 मध्ये विविध समुद्रकिनाऱ्यावरील भागात 200 हून अधिक पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गोव्यात समुद्रकिनारे पर्यटकांसाठी असुरक्षित असल्याचा संदेश जगात गेला होता. त्यामुळे तत्कालिन सरकारने समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने ‘दृष्टी लाईफसेव्हिंग’ कंपनीची नेमणूक केली. 2008 पासून जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात आल्यापासून ते आतापर्यंत 10 पेक्षा अधिक पर्यटक बुडून मृत्यू पावलेले नाहीत.

Goa Lockdown: सकाळी लोकांची मार्केटमध्ये वर्दळ; दुपारी 1 वाजला आणि... 

2019 मध्ये या जीवरक्षकांनी सर्वाधिक 541 जणांना समुद्राच्या पाण्यात बुडण्यापासून वाचविले होते. 2020 मध्ये पर्यटन काळात कोरोनाचे संकट होते, तरी गोव्यात आलेल्या पर्यटकांमधील सुमारे 249 तर 2021 मध्ये 204 जणांना वाचवण्यात यश मिळवले आहे. समुद्रकिनाऱ्यावर हे जीवरक्षक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तैनात असतात. वेळोवेळी पर्यटकांना खोल पाण्यात न जाण्याच्या सूचना करूनही काही पर्यटक पाण्यात उतरतात व समुद्रातील पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे ते आत ओढले जातात. अशावेळी जीवरक्षक जीव धोक्यात घालून या पर्यटकांना वाचवितात.  2011 ते 2021 पर्यंत समुद्रात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या 65 असली तरी जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे सुमारे 4 हजाराहून अधिकजणांचा जीव वाचला आहे. 

 

संबंधित बातम्या