Goa: मेगा प्रकल्पांना ग्रामसभेत स्थानिकाकडून विरोध

पंच सदस्य नंदिता दयाल यांनी यावेळी बोलताना साहित्य पुनर्प्राप्ती सुविधाही उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार पंचायत क्षेत्रात करण्यात येत असून याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे.
Goa: मेगा प्रकल्पांना ग्रामसभेत स्थानिकाकडून विरोध
वेलसांव पाली ईर्सोशी ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ व पंच सदस्य.Dainik Gomantak

दाबोळी: साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा (MRF) व मेगा प्रकल्पांना वेलसांव- पाली- इर्सोशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्थानिकाकडून विरोध दर्शविण्यात आला. वेलसांव पाली ईर्सोशी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज संपन्न झाली. यात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी गावात होऊ घातलेल्या साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा ( MRF) प्रकल्पाला विरोध दर्शविला. तसेच गावात एकही मेगा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे ग्रामसभेत ठणकावून सांगितले. ग्रामसभेची सुरूवातच तापट वातावरणात झाली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक पंचायत क्षेत्रात MRF सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंचायतीचे काम असून त्यानुसार प्रत्येक पंचायत क्षेत्रात एम आर एफ सुविधा उभारण्याचे काम चालू आहे.

 वेलसांव पाली ईर्सोशी ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ व पंच सदस्य.
वर्षभरात पुर्ण होणार दाबोळी विमानतळाचे काम ; गगन मलिक

दरम्यान वेलसांव पाली ईर्सोशी गावात ग्रामस्थांनी एमआरएफ सुविधेला कडाडून विरोध केला. या प्रकल्पामुळे गावातील वातावरण प्रदूषित होणार. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प गावकऱ्यांना घातक ठरेल. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे पंचायत मंडळाला सुचवले. तसेच गावात मेगा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला. गावात मेगा प्रकल्प आल्यास गावात पाण्याचा, विजेचा प्रश्‍न निर्माण होणार. त्यासाठी असले मेगा प्रकल्प गावात न आणण्याचे पंचायत मंडळाला सुचवले. गावातील खेतीवाडी नष्ट झाली आहे. तसेच मुलांना खेळायला साधे मैदान नाही. गावात एक मैदान बांधून देण्याचा ठराव ग्रामस्थांनी यावेळी पंचायत मंडळासमोर मांडला.

पंच सदस्य नंदिता दयाल यांनी यावेळी बोलताना साहित्य पुनर्प्राप्ती सुविधाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचायत क्षेत्रात करण्यात येत असून याला स्थानिक ग्रामस्थांचा(villagers) विरोध आहे. त्यानुसार ग्रामस्थांकडून आम्ही लेखी स्वरूपात हा विरोध दर्शविणारे प्रस्ताव, ठराव, त्यांचे नाव व फोन क्रमांक सही करून मागितले असून ते आम्ही उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

सरपंच हेंन्रीक्स डिमेलो यांनी बोलताना सांगितले की आजच्या ग्रामसभेत दोन मुख्य प्रकल्पांना विरोध ग्रामस्थांकडून करण्यात आला असून यात मुख्य म्हणजे एमआर एफ प्रकल्प व दुसरा मेगा प्रकल्प (Mega project) या दोन्ही प्रकल्पावर प्रकल्पाविषयी ग्रामस्थ सदस्य ग्रामस्थांचे विचार आम्ही ऐकून घेतले असून या विषयी ठराव संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून देणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com