Goa Lockdown: सकाळी लोकांची मार्केटमध्ये वर्दळ; दुपारी 1 वाजला आणि...

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 10 मे 2021

गोव्यात कालपासून संचारबंदी लागू केली, तरी सकाळच्या सत्रात जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची मार्केटमध्ये वर्दळ होती. काही ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त काही दुकाने खुली केली होती. मात्र, तेथे पोलिसांनी हस्तक्षेप करून ती बंद पाडली.

पणजी : गोव्यात(Goa) कालपासून संचारबंदी(Lockdown) लागू केली, तरी सकाळच्या सत्रात जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची मार्केटमध्ये(Market) वर्दळ होती. काही ठिकाणी अ(Police)त्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त काही दुकाने खुली केली होती. मात्र, तेथे पोलिसांनी हस्तक्षेप करून ती बंद पाडली. औषधालये(Medical) तसेच पार्सल सेवेसाठी (टेक अवे) रेस्टॉरंटस्(Hotels) खुली असली तरी दुपारी 1 वा. नंतर राज्यातील सर्व बाजारपेठा बंद होऊन सर्वत्र शुकशुकाट होता. ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची चौकशी केली जात होती. चोख पोलिस बंदोबस्त व पोलिस गस्तीमुळे वाहनचालकांनी रस्त्यावर येणे टाळले. (Goa Lockdown All markets were closed in Goa after 1P M)

ताळगावात तसेच पणजी शहरात पणजी पोलिस स्थानकाच्या जीपमधून पोलिस ध्वनिक्षेपकावरून कोणती दुकाने खुली असतील, तसेच कोणती नसतील याची जनजागृती करत होते. अत्यावश्‍यक सेवा नसलेली दुकाने खुली केली होती त्या दुकानधारकांना पोलिसांनी बंद करण्यास पाडले. भाजी व फळ विक्रेते तसेच किराणा मालाच्या दुकानांवर माल खरेदीसाठी लोक आले होते, त्यांना पोलिस सुरक्षित अंतर ठेवून वारंवार सूचना करताना दिसत होते. 

गोव्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गला ऑक्सिजनचा चा पुरवठा कसा करणार? 

दुपारी 1 वाजला आणि...
दुपारी 1 वाजण्यास काही मिनिटे असताना या व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होऊ शकते यासंदर्भातही अधूनमधून सूचना पोलिस करत होते. पोलिसांनी नाकाबंदी केली तरी सकाळच्या सत्रात सामान खरेदीसाठी मुभा असल्याने पोलिसांकडून वाहनचालकांची चौकशी केली जात नव्हती. मात्र, काहीजण हेल्मेट न वापरता फिरताना आढळून आलेल्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यात कुचराई केली नाही.

दाबोळी विमानतळावर चार महिन्यांत 2 कोटी 31 लाख रुपयांचे सोने जप्त 

पोलिस ठाणे सुनेसुने 
पोलिस खात्यातील सुमारे 80 टक्के पोलिस कर्मचारी आज रस्त्यावर तसेच गस्तीवर होते. आज पहिल्या दिवसापासूनच पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी रस्त्यावर येणाऱ्यांना समज देताना दिसत होते. उद्यापासून कठोर कारवाई केली जाईल अशी ताकीद रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालाकंना पोलिस देत होते. पोलिस स्थानकातील सर्व कर्मचारी रस्त्यावर असल्याने पोलिस ठाणे मात्र सुनेसुने होते. 

संबंधित बातम्या