Goa Lockdown: पहा काय सुरु काय बंद

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

29 एप्रिल ते 3 मे या कालावधीमध्ये पाच दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यात संपूर्ण लॉकडाऊन (Goa Lockdown) लावण्याचा निर्णय प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने घेतला आहे. पाच दिवसांचा लॉकडाऊन उद्यापासून सुरु होणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली आहे. विशेष म्हणजे गोवा राज्य कर्नाटक नंतर (Karnataka) दुसरं राज्य आहे जिथं लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Goa Lockdown See what started and what stopped)

पाच दिवसांच्या लॉकडाऊन काळात राज्यातील संपूर्ण सार्वजनिक वाहतूक (Pablic Transport) बंद राहणार आहे मात्र उद्योगधंदे चालू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीमध्ये पाच दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. तसेच लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं सुध्दा सांगण्यात आलं आहे. या काळात सर्व अत्यावश्क सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यात असणाऱ्या स्थलांतरित मजूरांनी राज्य सोडून जाऊ नये, असं देखील आवाहन देखील प्रमोद सावंत सरकारने केलं आहे.

ब्रेकिंग : गोव्यात पूढील 5 दिवस कडक लॉकडाऊन 

दरम्यान, या पाच दिवसांच्या लॉकडाऊन काळात राज्यातील जनतेनं कोरोना नियंमाचं पालन केल्यास कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाऊनची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे. 

पाच दिवसांच्या लॉकडाऊन काळात कॅसिनो (Casinos) बार पूर्णपणे बंद राहतील. तर राज्यातील रेस्टारंट (hotels) फक्त पार्सल सेवा देऊ शकणार आहेत. तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवांसाठी (Essential services) राज्यात येण्यास किंवा राज्यातून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची रोख असणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या