Goa Corona Update: गोव्यात 480 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 72 नव्या रूग्णांची नोंद

रिकव्हरी रेट वाढून तो 98.27 टक्के एवढा झाला आहे.
Goa
Goa Dainik gomantak

गोव्यात आज दिवसभरात 72 नव्या रूग्णांची नोंद झाली असून, 111 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. गोव्यात सध्याच्या घडीला 480 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, रिकव्हरी रेट वाढून तो 98.27 टक्के एवढा झाला आहे. (Goa lodges 72 new cases, 111 discharged 480 active corona cases)

Goa
TMC Goa: तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवा; डेरेक ओब्राईन यांचे गोमंतकीयांना अवाहन

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 57 हजार 363 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 2 लाख 52 हजार 918 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. दिवसभरात 844 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. नव्यान आज एकही रूग्ण रूग्णालयात दाखल करण्यात आलेला नाही.

देशात 46,389 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 46,389 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशात 6,422 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 5,748 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com