गोवा लोकायुक्तांकडून माजी सरपंचाविरोधात तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

गोवा लोकायुक्तने केलेल्या शिफारशीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेईश मागूश पंचायतीचे माजी सरपंच प्रसन्न नागवेकर व माजी सचिव सुबोध प्रभू यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

पणजी: गोवा लोकायुक्तने केलेल्या शिफारशीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेईश मागूश पंचायतीचे माजी सरपंच प्रसन्न नागवेकर व माजी सचिव सुबोध प्रभू यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

किनारपट्टी नियमन क्षेत्रात (सीआरझेड) असलेल्या पाच बांधकामांना संशयितांनी नियमांचे उल्लंघन करून व अधिकाराचा गैरवापर करून पंचायतीमध्ये ठराव घेतला व त्यांना संरक्षण दिले होते. तसेच त्यांनी घरपट्टीसाठी नोंदणीसाठी केलेल्या अर्जाला मंजुरी दिली होती. यासंदर्भातची तक्रार गोवा लोकायुक्तकडे दाखल झाली होती. लोकायुक्तने माजी सरपंच व सचिव या दोघांना पदाचा गैरवापर करून ही कृती केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

संबंधित बातम्या