आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या नंतरच विकास प्रकल्पांचे पहा: सुदिन ढवळीकर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

ऑनलाईन शिक्षणाचा सध्या राज्यात फज्जा उडाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ऑनलाईन शिक्षण मिळत नाही. त्यामुळे निदान दहावी व बारावीचे वर्ग सुरू करायला हरकत नाही. असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

फोंडा: कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या आणि नंतरच विकास प्रकल्पांचे पहा. सध्या सरकारकडून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचे रोखे विकत घेतले जातात, हे पैसे कोरोना महामारीच्या काळात चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी वापरा आणि नंतर इतर विचार करा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, शैक्षणिक वर्ग सुरू करताना आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा पहा, वर्ग सुरू झाले पाहिजे, पण आवश्‍यक खबरदारी घेऊन, असे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षणाचा सध्या राज्यात फज्जा उडाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ऑनलाईन शिक्षण मिळत नाही. त्यामुळे निदान दहावी व बारावीचे वर्ग सुरू करायला हरकत नाही. मात्र, हे वर्ग सुरू करताना सुरक्षेची सर्व काळजी आणि खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सरकारने शाळा व्यवस्थापनांकडे बोलणी करून ही तजवीज आधी करावी, शिक्षणाचे तास वाढवले तरी चालतील, पण एका वर्गात कमीत कमी विद्यार्थी बसवले पाहिजे आणि इतर काळजी घेतली पाहिजे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या