गोवा: कडक निर्बंधांमुळे रिक्षा चालक, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे नुकसान

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

कर्फ्यूमुळे सकाळच्या सत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरू राहतात.

पणजी: कोरोनाचे संकट (CoronaSecond Wave) टाळण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात सध्या कडक कर्फ्यू (Curfew) सुरू आहे. कडक आचारसंहितेमुळे रिक्षा चालक व पायलट यांच्यावर संकट कोसळले असून, या कडक कर्फ्यूचा त्यांना फटका बसला आहे. कर्फ्यूमुळे सकाळच्या सत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरू राहतात. मात्र, इतर वाहतूक, खासगी दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. या एकूणच कर्फ्यूचा सगळ्यात जास्त फटका रोजंदारीवर तथा दर दिवशी कमाई करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्यांना बसला आहे. दरदिवशी भाडी मारुन, प्रवासी वाहतूक करून आपले कुटुंब चालवत होते, त्या रिक्षा चालकांना व पायलटांना बसला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक आणि दुचाकी चालवणारे पायलट आहेत. परंतु सध्याच्या कर्फ्यूमुळे त्यांना आपली वाहने बंद ठेवावी लागलेली आहेत. कमाई बंद झाली आहे. (Goa Loss of rickshaw pullers and wage earners due to strict restrictions)

कोरोना संकटामुळे राज्यात पर्यटन येणे बंद झाले आहेतच, पण इतर नागरिकही बाहेर फिरत नाहीत. रिक्षा चालक आणि पायलट यांना वाहने बंद ठेवावी लागलेली असल्याने भाडी मिळत नाहीत. दररोज कमाई करून त्याच कमाईवर आपले कुटुंब हे रिक्षा चालक आणि पायलट चालवत होते. मुलांचे शिक्षण, घरखर्च हेही दररोजच्या कमाईवर करावे लागत होते.  दिवसाला जी 700 ते 900 रुपयांपर्यंतची कमाई होत होती, त्यावरच त्यांचे कुटुंब चालत होते. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत रिक्षाचालक आणि पायलट आहेत. 

गोवा हद्दीत कोविड चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे

रिक्षा चालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, गोव्यातील सर्वच रिक्षाचालकांवर या कर्फ्यूचा परिणाम झालेला आहे. दिवसाच्या कामाईवर आम्ही आमचे कुटुंब चालवत होतो. मात्र रिक्षा बंद ठेवाव्या लागल्यामुळे कमाई नाही. अशा स्थितीत जगायचे कसे? असा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकलेला असून, सरकारने आम्हा रिक्षा चालकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. दुसरीकडे पायलटांनीही आपल्यावर संकट कोसळल्याचे सांगत सरकारने पायलटांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
 

संबंधित बातम्या