'राज्य सरकारने गोव्याची सुरक्षित पर्यटनस्थळ अशी ओळख संपवली'

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मे 2021

पर्यटकांना सुरक्षित कसे ठेवणार असे वाटल्याने सर्वांनीच गोव्याकडे पाठ फिरवली आहे. याचे दूरगामी परिणाम गोव्याच्या पर्यटनाला सरकारच्या नाकर्तेपणामुळे भोगावे लागतील, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.

पणजी: राज्य सरकारने (Goa)गोव्याची सुरक्षित पर्यटनस्थळ(Tourist place) अशी ओळख संपवली आहे. पर्यटक यावेत यासाठी कोविड(Covid-19) नसल्याच्या प्रमाणपत्राची सक्ती सरकार करू पाहत नव्हते. आता दररोज पन्नासच्यावर होणाऱ्या कोविड मृत्यूमुळे सरकार आपल्याच नागरिकांना सुरक्षित ठेऊ शकत नाही, तर मग पर्यटकांना सुरक्षित कसे ठेवणार असे वाटल्याने सर्वांनीच गोव्याकडे पाठ फिरवली आहे. याचे दूरगामी परिणाम गोव्याच्या पर्यटनाला(Tourism) सरकारच्या(Government) नाकर्तेपणामुळे भोगावे लागतील, असा इशारा गोवा फॉरवर्डचे(Goa Forward party) अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई(Vijay sardesai) यांनी दिला.(Goa lost its reputation as a safe tourist destination)

Vaccination: गोव्यात काल 4444 जणांचे लसीकरण; राज्याकडे आता दिड लाख डोस शिल्लक 

ते म्हणाले, राज्यात टाळेबंदी लागू करा, अशी जनतेची मागणी होती, विरोधी पक्षातील आमदार सांगत होते, त्यावेळी सरकारने अहंकारामुळे त्याकडे दुर्लक्ष केले. राज्यात येणाऱ्यांकडून कोविड नसल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करा, अशीही मागणी करण्यात येत होती. त्यावेळी मंत्री मग पर्यटक कसे येतील. पर्यटन बंद पडले, तर सर्व गोवा कोलमडेल, असे सांगत होते. आज काय झाले. पर्यटनाने केव्हाच गाशा गुंडाळला आहे. गोव्यात काहीच सुरक्षित नाही. हजारो कोविड रुग्ण दररोज सापडत आहेत, हा संदेश जगभर गेला आहे. खाणी बंद पाडल्या आता पर्यटन क्षेत्रही सरकारी अहंकारामुळे नष्ट झाले आहे. आता ते पूर्व स्थितीवर येणे तसे कठीणच आहे.

न्यायालयाने गोवा सरकारला दिलेले 10 आदेश 

सरकारकडे बुद्धी शिल्लक राहिली नसावी, तसे निर्णय घेतले जात आहेत. फातोर्ड्यात पोलिस घराबाहेर पडणाऱ्यांच्या मागे लागत आहेत. सरकारच्या आदेशाची ते अंमलबजावणी करतात असे मानले, तर मग रवींद्र भवनात कोणताही शाररीक अंतराचा, मास्क वापरण्याचा निकष न पाळता जमलेले चारशे जण त्याच पोलिसांना कसे काय दिसत नाहीत. सरकार कशाविषयीही गंभीर नाही. सगळ्यांनीच सरकारकडे बोटे दाखवणे सुरु केले तेव्हा सरकार खडबडून जागे झाले आणि मुख्यमंत्री धावाधाव करू लागले. त्यातून आता काहीच साध्य होणारे नाही. शेकडो गोमंतकीयांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपला जीव आधीच गमावला आहे.

संबंधित बातम्या