Goa: लॉटरी ही गणेशोत्सव मंडळाचा आर्थिक कणा; सभापती पाटणेकर

डिचोली सार्वजनिक मंडळाच्या लॉटरी विक्रीचा शुभारंभ (Goa)
Goa: लॉटरी ही  गणेशोत्सव मंडळाचा आर्थिक कणा; सभापती पाटणेकर
Unveiling of lottery tickets at Ganeshotsav Mandal Bicholim, GoaTukaram Sawant / Dainik Gomantak

Bicholim: आर्थिक बाजू भक्कम असल्याशिवाय कोणत्याही संस्थेचे कार्य पुढे नेणे अवघड असते. लॉटरी (Lottery) ही गणेशोत्सव मंडळांचा (Ganeshotsav Mandal) आर्थिक कणा आहे(Financial Backbone). असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार (Bicholim MLA) तसेच विधानसभेचे सभापती (Assembly Speaker) राजेश पाटणेकर (Rajesh Patanekar) यांनी केले. गणेशभक्तांनी लॉटरी खरेदी करून डिचोली गणेशोत्सव मंडळाच्या चांगल्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहननी पाटणेकर यांनी केले. डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरी विक्री योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात ते प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. सार्वजनिक गणपती पूजन मंडपात आयोजित या सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेविका ऍड. अपर्णा फोगेरी, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्याम मातोणकर, सचिव विठ्ठल वेर्णेकर खजिनदार नरेश कडकडे आणि लॉटरी प्रमुख नितीन कुंभारजुवेकर उपस्थित होते.

Unveiling of lottery tickets at  Ganeshotsav Mandal Bicholim, Goa
श्रावण मासारंभाने डिचोलीत फुलांना 'अच्छे दिन'

यावेळी कुंदन फळारी यांनी बोलताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्याची स्तुती केली. 'कोविड' संकट लवकर टळो आणि पुढील वर्षीपासून अकरा दिवस गणपती साजरा करण्यास मिळो. अशी इच्छाही त्यांनी प्रगट केली. ऍड.अपर्णा फोगेरी यांनी प्रत्येक गणेशभक्तांनी लॉटरी खरेदी करून मंडळाला सहकार्य करून 'कोविड' नियमांचे पालन करून चतुर्थी साजरी करावी. असे आवाहन केले. स्वागत श्याम मातोणकर यांनी केले. नितीन कुंभारजुवेकर यांनी लॉटरी विषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन नरेश कडकडे यांनी केले. विठ्ठल वेर्णेकर यांनी आभार मानले. (Goa)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com