Goa Liquor Seized: दवाच्या नावाखाली दारूची वाहतूक, पुण्यात गोवा बनावटीची 66 लाख रूपयांचे मद्य जप्त

पथकाने विविध ब्रँडची विदेशी दारू आणि बिअर असा एकूण 845 मुद्देमाल जप्त केली आहे.
Goa Liquor Seized
Goa Liquor SeizedDainik Gomantak

औषध वाहतुकीच्या नावाखाली गोव्यातून महाराष्ट्रात करण्यात येणाऱ्या बीअर आणि विदेशी दारूची तस्करी उघडकीस आली आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे येथील पथकाने सोमाटणे पथकर नाक्याजवळ ही कारवाई केली.

पथकाने 65 लाख 90 हजार 160 रुपयांची दारूही जप्त करत, ट्रकचालकाला अटक केली आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे पथकर नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. शंकरलाल नारायण जोशी (46) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्यासह ओमपुरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा राज्यात उत्पादित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी परवाना असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याअंतर्गत तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सोमाटणे पथकर नाका परिसरातील सोमाटणे गावात सापळा रचला.

दरम्यान, पथकाने एका कंटेनर ट्रकला संशयावरून अडवले. ट्रकची तपासणी केली असता गोव्यातून औषधांची वाहतूक करण्याच्या नावाखाली दारूची तस्करी होत असल्याचे आढळून आले. विविध ब्रँडची विदेशी दारू आणि बिअर असा एकूण 845 मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Goa Liquor Seized
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपालच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, पंजाबमध्ये हाय अलर्ट

गोवा राज्यात उत्पादन व विक्रीसाठी निघालेल्या विविध प्रकारची विदेशी दारू व बिअर असा एकूण 65 लाख 90 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारू व वाहनांसह 86 लाख 160 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पुणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणजितसिंह राजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडेचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, प्रियांका राठोड, सहायक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, आर. सी.लोखंडे, जवान तात्याबा शिंदे, राहुल जंजाळ, संजय गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com