गोवा-महाराष्ट्र सीमा  बंद; रॅपिड अॅंटीजेन चाचणी मात्र अनिवार्य 

banda-satmatwadi toll naka.jpg
banda-satmatwadi toll naka.jpg

गोवा: महाराष्ट्रासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ  सातत्याने  वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग-गोवा सीमेच्या महामार्गावर बांदा-सटमटवाडी सीमा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  गोव्यातून सिंधुदुर्गात जाणारा बांदा-सटमटवाडी टोल नाका येथे आज सकाळपासून या सीमा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवास करणाऱ्यासाठी रॅपिड अॅंटीजेन चाचणी ही अनिवार्य करण्यात आली आहे. चाचणी  केल्यानंतरच प्रत्येकाला प्रवेश देणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. (Goa-Maharashtra border closed; Rapid antigen testing, however, is mandatory) 

तसेच,  महाराष्ट्र राज्य सरकारने गोव्यासह आणखी सहा राज्ये ही प्रवासासाठी अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बांदा-सटमटवाडी टोल नाक्यावर सकाळपासून बंदी करण्याचा निर्णय घेतलयाचे दिसत आहे. चिंताजनक बाब म्हणजे, सावंतवाडी, दोडमार्ग, मालवाण, अंबोली, कुडाळ  व वेंगुल  तालुक्यातील अनेक लोक नोकरीसाठी दररोज गोव्यात प्रवास करत असतात. अशा लोकांना  रॅपिड अॅंटीजेन चाचणी करून दहा दिवस प्रवासाची सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर गोव्यातून  सिंधुदुर्गात जणाऱ्यांची  रॅपिड अॅंटीजेन चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागची पथक  तैनात करण्यात आली आहे. 

मात्र, अनेकजण  गोव्यातून सिंधुदुर्ग  जिल्ह्यात प्रवास करण्याकरिता छुप्या मार्गाचा वापरही करतात, त्यामुळे पोलिसांचे काम जास्त वाढले आहे. त्यांना आशा  लोकांवर सुद्धा लक्ष्य ठेवावे लागणार आहे. त्या लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षी 25 नोव्हेंबरला महसूल, पोलिस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या देखरेखीखाली 24 तास   बांदा-सटमटवाडी या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग नाका उभारण्यात आला होता. महाराष्ट्रातून येणाऱ्या  पर्यटकांची संख्या लक्षात घेता राज्यांच्या सीमेवर थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाके उभे करण्यात आले होते. 25  नोव्हेंबरला बांदा-सटमटवाडी येथे थर्मल स्क्रिनिंग नाके उभे करण्यात आले होते.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com