Goa: दाबोळीतील वाडे तळ्याची देखभाल करणे अत्यंत गरजेचे

वाडे तळ्याचे पाणी समुद्रात जाणाऱ्या नाल्यातील गाळ काढण्यात येत आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आला असला तरी तळ्याचे पाणी समुद्रात जात नाही. यासाठी सूडाने पुन्हा एकदा या तळ्याची पाहणी करून सप्टेंबर महिन्यापूर्वी तळे साफ करून देणे गरजेचे आहे.
Goa: दाबोळीतील वाडे तळ्याची देखभाल करणे अत्यंत गरजेचे
वाडे तळ्यातील पाणी समुद्रात जाणार्‍यां नाल्यातील गाळ जेसीबीद्वारे काढताना.Dainik Gomantak

दाबोळी: मुरगाव नगरपालिकेच्या (Murgaon Municipality) ताब्यातील दाबोळी येथील वाडे तळ्याची देखभाल (Maintenance of Wade Lake at Daboli) करणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण तळ्यात प्लास्टिक बरोबर तळ्यात विचित्र प्रकारची बुरशी तयार झाल्याने पूर्ण तळ्याचे पाणी प्रदूषित झाले आहे. राज्य नगरविकास संस्था (सूडाने) तळ्याची साफसफाई (cleaning) करण्यासाठी राज्य जलस्त्रोत विभागाचे सहकार्य (Cooperation of State Water Resources Department) घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग २४ मधील वाडे तळ्याचे सौंदर्यीकरण लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने संबंधित विभागाने त्वरित याविषयी लक्ष देणे गरजेचे आहे. दाबोळी येथील वाडे तळे राज्य नगरविकास खात्याच्या राज्य नगर विकास संस्था (सुडा) मार्फत १८ कोटी रुपये खर्चून बांधलेले होते. सदर वाडे तळे चर्च संस्थेचे असल्याने चर्चने या तळ्याची जबाबदारी मागितली होती. सूडाने तळ्याचे सौंदर्यीकरण केल्याने आता वाडे तळे राज्य सरकारच्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येत आहे. यामुळे संपूर्ण तळ्याची देखभाल मुरगाव नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. पण गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण वाडे तळ्याचे पाणी दूषित झाल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. तळ्याच्या पाण्यात बुरशी निर्माण झाल्याने सदर तळ्याचे पाणी प्रदूषित होत चालले आहे. यासाठी मुरगाव नगरपालिकेने त्वरित तळ्यातील बुरशी काढण्यासाठी राज्य जलस्त्रोत विभागाकडे संपर्क करावा अशी मागणी वाडे भागातील नागरिकांकडून होत आहे.

वाडे तळ्यातील पाणी समुद्रात जाणार्‍यां नाल्यातील गाळ जेसीबीद्वारे काढताना.
Goa: राज्यात डेंग्यूचा धोका वाढला!

वाडे तळ्यातील पाणी समुद्रात योग्यरीत्या ये-जा होत नसल्याने पाणी प्रदूषित होत आहे पूर्वे वाडे तळे ते वाडे येथील समुद्र किनारा दोन दोनशे मीटर अंदाजे असल्याने तळ्यातील पाणी समुद्रात योग्य प्रकारे जात होते. जेव्हा येथे चर्च संस्थेने उच्च माध्यमिक विद्यालय उभारले तेव्हा तळ्यातील पाणी समुद्रात जाणारी वाट अरुंद व काहीप्रमाणात बंद झाल्याने पाणी समुद्रात भरती-ओहोटी वेळी योग्य रीत्या जात नसल्याने संपूर्ण तळ्याचे पाणी दूषित होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. वाडे तळ्याचे पाणी समुद्रात जाणाऱ्या नाल्यातील गाळ काढण्यात येत आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आला असला तरी तळ्याचे पाणी समुद्रात जात नाही. यासाठी सूडाने पुन्हा एकदा या तळ्याची पाहणी करून सप्टेंबर महिन्यापूर्वी तळे साफ करून देणे गरजेचे आहे. कारण गणेश चतुर्थीपूर्वी तळे साफ करणे महत्त्वाचे आहे. मुरगाव नगरपालिकेत तळ्यातील प्लास्टिकचा साठा काढण्यासाठी कामगार कैनात करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वास्कोतील वाडे तलाव मुरगांव नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावे, कोणत्याही खाजगी संस्थेकडे नको, असे स्पष्ट मत नितीन फळदेसाई यांनी केले आहे. वाडे तलाव ही वास्तविक कोणाची खाजगी मालमत्ता नाही. पाण्याचा तलाव हा 'वॉटर बॉडी' घ्या अखत्यारित येतो. गेली कितीतरी वर्षे या तलावात या भागातील नवेवाडे, वाडे, शहर परिसर या विभागातील गणपतींचे विसर्जन करण्यात येते.

वाडे तळ्यातील पाणी समुद्रात जाणार्‍यां नाल्यातील गाळ जेसीबीद्वारे काढताना.
Goa: राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले

मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी सेंट ऍन्ड्रूज चर्चच्या ताब्यात असलेले महाविद्यालय येथे स्थलांतर करण्यात आले. आता ही संस्था तलाव आपल्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी करत आहे. हा तलाव आपल्या ताब्यात आला तर त्याचा उपयोग संस्था आपल्या पद्धतीने उपयोग करेल. न जाणे उद्या तलावात गणपती विसर्जन करण्यास विरोध करण्यात येऊ शकतो, असे नितीन फळदेसाई यांचे मत आहे.

तसेच आता पर्यंत या तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी सुडाचा म्हणजेच जनतेचा पैसा प्रत्यक्षात वापरण्यात आला आहे. मग आत्ता तलाव खाजगी संस्थेकडे देण्यासाठी धडपड का होत आहे, हे न कळण्यासारखे आहे, असे फळदेसाई म्हणाले. मुळात या तलावाची समुद्रातील भरती-ओहोटीशी संबंध होता. समुद्राच्या वेळे प्रमाणे या तलावात ही भरती ओहोटी यायची. पण सुशोभीकरण करताना समुद्राशी असलेली नाळच तोडल्याने आता भरती ओहोटी प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे आत मधील पाणी कुजून तलावा शेजारील लोकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाला आहे.आरोग्य खाते या कडे लक्ष देणार की नाही? या सर्व गोष्टी पुर्वापार जसे सूरू होते, तसे राहाण्यासाठी तलावाच ताबा खासगी संस्थेकडे न जाता तो मुरगांव नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी फळदेसाई यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com