Goa: मांद्रेत १३० ख्रिस्ती महिलांचा कॉंग्रेसमधून मगोत प्रवेश

जीत आरोलकरांना पाठिंबा : स्थानिक आमदारांवर रोष
Goa Mandre mgp Politics
Goa Mandre mgp PoliticsDainik Gomantak

मोरजी : मांद्रे मतदारसंघातील सुमारे (Goa) १३० ख्रिस्ती महिलांनी (Christian Womens) रविवारी मगो (Mgp Politics) पक्षात प्रवेश केला. इतक्या मोठ्या संख्येने ख्रिस्ती महिलांनी पक्षप्रवेश करणे, ही मगो पक्षाच्या संदर्भातील गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी घटना आहे. कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार देण्यात येणाऱ्या आश्‍वासनांना कंटाळून या १३० महिलांनी आज मगोमध्ये प्रवेश केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मगोची ताकत वाढवण्यासाठी येथील १३० ख्रिस्ती महिलांनी प्रवेश करून आगामी निवडणुकीत मगोला गतवैभव मिळवण्यासाठी कंबर कसली आहे, असे मगोचे नेते जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी यावेळी सांगितले. ख्रिस्ती महिलांनी पक्षप्रवेश केल्यानंतर ते स्थानिक पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र प्रभुदेसाई यांनी, आरोलकर यांच्या कार्याची दखल घेऊन अनेकजण मगोत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

Goa Mandre mgp Politics
Goa: फातर्पा ग्रामसभा स्मशानभूमी प्रकरणी चांगलीच गाजली; पंचायत मंडळाला धरले धारेवर

मगोचे उमेदवार जीत आरोलकर (Jeet Arolkar) हे आमच्या अडीअडचणीच्या वेळी धावून आले. पडत्या काळात त्यांनी आम्हाला भरीव मदत केली. येत्या निवडणुकीत आम्ही मांद्रेतील ख्रिस्ती मतदार त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार, अशी प्रतिक्रिया एका ख्रिस्ती महिलेने यावेळी व्यक्त केली. आणखी एक महिला म्हणाली, की जितके सहकार्य स्थानिक आमदारांनी नाही केले, त्यापेक्षाही अधिक सहकार्य जीत आरोलकर यांनी केले आहे. त्यामुळे आम्ही महिलांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ठरविले आहे. आमच्या वाड्यावरील कपेलाची खूपच दुरवस्था झाली होती. त्यावेळी जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी कोणताही विचार न करता हे कपेल दुरुस्त करण्यासाठी सढळ हस्ते मदत केली. पावसाळ्यात आमच्या वाड्यावर झाडे पडली होती. तेव्हाही प्रशासन नव्हे, तर जीत आरोलकर हे आमच्या मदतीसाठी आधी धावून आले होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत यावेळी निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केल्या असल्याचे अन्य काही महिलांनी यावेळी सांगितले.

Goa Mandre mgp Politics
Goa: चोरट्यांच्या टोळीला अखेर बेळगावात अटक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com