गोव्यात आंब्याचे दर कमी तरीही ग्राहकांची पाठ; जाणून घ्या कारण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

कोविडमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे विक्रेते, उत्पादक बागायदारांचे नुकसान 

फातोर्डा: मे महिना हा गोव्यात मानकुराद आंब्याच्या (Mango) तेजीचा मोसम असतो. पण कोविडमुळे (Corona) ग्राहकांनीच (Customer) पाठ फिरवल्यामुळे विक्रेते, उत्पादक बागायदार यांना नुकसान होत आहे.  मडगाव (Madgoan) बाजारात मानकुराद आंब्यांची आवक वाढली आहे. पण कोरोनाच्या वाढत्या व गंभीर परिस्थितीमुळे व मडगाव शहरात सर्वाधिक रुग्ण असल्याने लोक बाजारात फिरकत नाहीत. शिवाय 10 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करून दुकानदारांनी आपली दुकांने बंद केल्याने मडगाव शहरातील वर्दळ पुष्कळ कमी झाली आहे. त्यामुळे मानकुराद आंबे असूनही व त्यांचे दर 400 ते 500 रुपये डझन एवढे कमी असूनही विकत घेणारे येत नसल्याने विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागत आहे.(In Goa, mango prices are low but purchases are low)

आंब्यांबरोबर फणसाचीही आवक वाढली आहे. फणस दोन प्रकारचे असतात. एक कापा (बरकय) जो कातली प्रमाणे कुरकुरीत व गोडही असतो. दुसरा रसाळ, यामध्ये मध जास्त असते. या फणसाचा उपयोग धोंडस किंवा फणस पोळी करण्यासाठी उपयोग होतो. तरी सुद्धा लोकांना कापो पणस जास्त आवडतो व तो महागही असतो. 

गोव्यातील मराठी हिंदी मालिकाचे शूटिंग 10 मे पर्यंत बंद; सेटवर कार्यकर्त्यांचा राडा

सद्या बाजारात कापो फणसाचा दर आकारा प्रमाणे 150 ते 200 रुपये एवढा आहे. काही विक्रेते फणस कापुन व शिऱ्या करुन विकतात. मात्र फणस विक्रेत्यासमोर सुद्धा ग्राहक नसल्याने समस्या उत्पन्न झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील आणखी आठ दिवसात मानकुराद आंबे व फणसाचे दर अगदी कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही आंबा विक्रेत्यांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की, "यंदा आंबे विक्रीची उलाढाल अगदीच कमी झालेली आहे. आम्ही ज्या भाटकारांकडुन आंबे आणतो त्यांच्याकडे पुर्वीच कंत्राट केल्याने आता आम्हाला त्यांच्याकडुन पुर्वी घेतलेल्या दराने आंबे घ्यावेच लागतात. शिवाय झाडावरुन आंबे काढणारी माणसे मिळणेही कठीण आहे. यंदा आमचा धंदा नुकसानीत जाणार म्हणुन भिती वाटू लागली आहे."

संबंधित बातम्या