गोवा राज्यातील धरणे 100 टक्के फुल्ल!

सध्‍या पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागली आहेत.
Goa Dam
Goa DamDainik Gomantak

राज्यातील अंजुणे, साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी आणि गावणे ही सहाही धरणे 100 टक्के फुल्ल भरलेली आहेत. सध्‍या पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत.

राज्‍याच्‍या पाणीपुरवठ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महाराष्ट्रातील तिळारी धरण सध्‍या 92 टक्के भरले आहे. गेल्‍या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्‍यामुळे तिळारी (Tillari), साळावली (Salaulim) आणि अंजुणे (Anjunem Dam) या तीन धरणांमधून पाण्‍याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. यंदा ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला होता. त्‍यामुळे धरणेही अर्धवट भरली होती. पण आता ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.

Goa Dam
गोवा विमानतळ चार्टर्ड उड्डाणासाठी सज्ज; 'या' देशांनी केली शिफारस

चापोली धरणाची पाणी साठविण्‍याची क्षमता 1122 हेक्टर मीटर असून सध्‍या त्‍यात 1122.31 हेक्टर मीटर पाणी आहे. आमठाणे धरणात 585 हेक्टर मीटर पाणी साठवता येते व सध्‍या या धरणात तेवढेच पाणी आहे. पंचवाडी धरणात 437 हेक्टर मीटर तर गावणे धरणात 177 हेक्टर मीटर पाणी साठवता येते. ही दोन्‍ही धरणे 100 टक्के भरली आहेत.

इतर धरणांच्‍या तुलनेत या धरणांची पाणी साठवण क्षमता कमी आहे. मात्र धरणक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात ही छोटी धरणेही महत्त्वाची भूमिका बजावतात.

Goa Dam
जुन्या बोरी पुलावरून नदीत कोसळल्याने दोन कामगार बेपत्ता

तिळारी धरण 92 टक्के भरले; गोव्‍याची ‘तहान’ भागणार: गोव्‍याला पिण्याचे तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील तिळारी धरणाची क्षमता 46,217 हेक्टर मीटर इतकी आहे. सध्या या धरणात 41,855 हेक्टर मीटर पाणी आहे. तुलनात्मकदृष्‍ट्या धरणाची पाणी साठवण्‍याची क्षमता आणि कार्यक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे पाणी नियोजनासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवावा लागतो.

सध्या हे धरण 92 टक्के भरले आहे. राज्‍यातील साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी आणि गावणे ही पाच धरणे जुलैच्या मध्यापर्यंत तर अंजुणे धरण ऑगस्टच्या मध्यापर्यंत भरते असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही तीच स्थिती असली तरी ऑगस्टमध्ये कमी झालेल्‍या पावसामुळे यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यास विलंब झाला आहे.

Goa Dam
MLA Antonio Vas: कुठ्ठाळी येथील मार्केट कॉम्प्लेक्सचे लवकरच लोकार्पण

‘अंजुणे’त 4434 हे. मी. पाणी सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणाची क्षमता 4484 हेक्टर मीटर असून सध्‍या त्‍यात 4434 हेक्‍टर मीटर पाणी आहे. मात्र या धरणाची ‘कॅचमेंट एरिया’ छोटी असल्याने ते साधारणपणे ऑगस्ट महिन्‍यापर्यंत भरते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदा मात्र हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडावा लागला.

प्रमोद बदामी, संचालक, जलसंपदा खाते

राज्यातील छोटी धरणे यापूर्वीच ओव्हर फ्‍लो झालेली आहेत. मुख्‍य सहा धरणेही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्‍यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी आता मुबलक पाणी उपलब्‍ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com