Goa Mansoon: डिचोलीतील नद्यांच्या पातळीत वाढ

Goa Mansoon: सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहेत.
Goa Mansoon
Goa MansoonDainik Gomantak

Bicholim: डिचोलीत गेल्या दोन दिवसांप्रमाणेच काल सायंकाळी देखील पर्जन्यवृष्टी झाली. मात्र कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी होता. दरम्यान, सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून नद्यांच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे.

काल सायंकाळी ते रात्रीपर्यंत जवळपास तीन तास मुसळधार पाऊस (Torrential Rain) पडला. कालच्याप्रमाणेच आज सायंकाळी ढगाळ हवामान निर्माण होवून ढगांचाही सौम्य गडगडाट सुरू झाला. पाच वाजण्याच्या सुमारास पाऊसधारांची बरसातही सुरू झाली. मात्र, अर्ध्या तासानंतर पाऊस ओसरला.

Goa Mansoon
Goa Pollution: प्रदूषण नियंत्रण मंडळाला अखेर जाग !

गावठण-साखळी रस्त्यावर आज सकाळी एक झाड कोसळले. डिचोली अग्निशमन दलाच्या (Bicholim Fire Brigade) जवानांनी झाड कापून बाजूला करीपर्यंत या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली. आज सायंकाळी पडलेल्या पावसावेळी मात्र अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com