Goa: गांजा प्रकरणी अटक केलेल्या मंतेशीचा न्यायालयाने नाकारला जामीन
CourtDainik Gomantak

Goa: गांजा प्रकरणी अटक केलेल्या मंतेशीचा न्यायालयाने नाकारला जामीन

फातोर्डा पोलीसांनी (Fatorda Police) त्याला अटक केली असता त्याच्याकडे 2 किलो गांजा सापडला होता. त्याची किंमत बाजारात 2 लाख एव्हढी होते.

मडगाव: मडगाव बस स्थानकावर (Madgaon bus stand) गांजा विकायला आला असता फातोर्डा पोलिसांनी अटक केलेल्या मंतेश नेवर्गी (Mantesh Newargi) या 21 वर्षीय युवकाने जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा (Irshad Aga) यांनी फेटाळून लावला. फातोर्डा पोलीसांनी (Fatorda Police) त्याला अटक केली असता त्याच्याकडे 2 किलो गांजा सापडला होता. त्याची किंमत बाजारात 2 लाख एव्हढी होते.

सदर युवक झुवारीनगर (Zuwarinagar) येथे राहणारा असून तो वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करत होता. या युवकाने गांजा कुठून आणला त्याची चौकशी करण्यासाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवून त्याची चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

Related Stories

No stories found.