Goa : राज्यातील अभियांत्रिकीच्या तब्बल तीनशे जागा रिक्तच

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 11 जून 2021

राज्यात अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागा रिक्त राहत नाहीत. पहिल्या फेरीतच बहुतांश जागा भरल्या जातात. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत उर्वरित जागा भरल्या जातात. चौथ्या फेरीची गरज भासत नाही.

पणजी : कोविडमुळे (Corona) अनेकांचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले. याचमुळे इच्छा असूनही अनेकांना आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण (Education) देण्याचा निर्णय रहीत करावा लागला. परिणामी राज्यातील अभियांत्रिकी (Engineering Posts) पदवीच्या तब्बल तीनशे जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा तीच स्थिती कायम राहील का, असा प्रश्न कायम आहे. (Goa As many as 300 engineering posts are vacant in the state)

यासंदर्भात, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक विवेक कामत (Vivek Kamat) म्हणाले, की राज्यात अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागा रिक्त राहत नाहीत. पहिल्या फेरीतच बहुतांश जागा भरल्या जातात. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत उर्वरित जागा भरल्या जातात. चौथ्या फेरीची गरज भासत नाही. मात्र गेल्या वर्षी जागा उपलब्ध पण विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती उद्‍भवली. प्रवेश परीक्षेनंतर अनेक फेऱ्या प्रवेशाच्या झाल्या पण या जागाच भरल्या गेल्या नाहीत. यंदाही कोविडचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे जागा भरल्या जातील की नाही, याविषयी आताच ठोस काही सांगता येणार नाही.

Goa Board: दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा द्या!

औषधनिर्मिती शास्त्र अभ्यासक्रम जागांत वाढ
औषधनिर्मिती शास्त्र अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात आल्याची माहिती कामत यांनी दिली. पणजीतील सरकारी औषधनिर्मिती शास्त्र महाविद्यालयातील जागा ६० वरून ७५ करण्यात आल्या आहेत. फर्मागुढीच्या महाविद्यालयातील जागांची संख्या ६० वरून ७५ व आता ११० करण्यात आली आहे.

कुठे, किती जागा
राज्यात गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय (४५० जागा), पाद्रे कोसेसाव अभियांत्रिकी महाविद्यालय (३०० जागा), रायेश्वर अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान शैक्षणिक संस्था (३०० जागा), डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय (३०० जागा), आग्नेल तंत्रज्ञान व डिझाईन शैक्षणिक संस्था (२२५ जागा) या महाविद्यालयांत अभियत्रिकी पदवीचे शिक्षण दिले जाते. एकूण १ हजार ५७५ जागा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. आणखीन ६६ जागा विदेशी विद्यार्थ्यांसाठी  वाढवण्याची तरतूद आहे. मात्र सर्वच जागा गेल्या वर्षीपर्यंत भरल्या जात होत्या मात्र कोविडच्या काळात या जागांसाठी विद्यार्थी नसल्याने तीनशेहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.

 

संबंधित बातम्या