Goa Latest News: म्हापसा कोर्ट जंक्शन परिसरात ‘फुटपाथ’

Goa Latest News: नगरपालिका बैठकीत निर्णय : खर्च अंदाजे 3.92 कोटी रुपये
Mapusa Municipal Council | Goa News
Mapusa Municipal Council | Goa NewsDainik Gomantak

Goa Latest News: कोर्ट जंक्शन ते जिल्हा इस्पितळापर्यंत म्हापसा पालिकेकडून रस्त्यालगत एकाबाजूनेच फुटपाथ उभारण्याचा निर्णय घेतला असून, सर्वांनुमते हा ठराव शुक्रवारच्या पालिका मंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. या कामाचा खर्च 3.92 कोटी रुपये अंदाजे किंमत ठरविली आहे.

मुख्याधिकारी व इतर नगरसेवक हे उपस्थित होते. कोर्ट जंक्शन ते जिल्हा इस्पितळ हा व्यस्त मार्ग असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी वाट नाही. याशिवाय वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळेच याविषयी सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅड. क्लॉड अल्वारिस यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

त्यानुसार, या न्यायालयाने म्हापसा पालिकेस सर्वोच्च प्राधान्यावर याठिकाणी फुटपाथ उभारण्याचे निर्देश दिलेत. पालिकेच्या अभियंत्यांकडून या कामाचे अंदाजपत्रक बनविले व 3 कोटी 92 लाख 26 हजार 993 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

नगरसेवक अ‍ॅड. नार्वेकर म्हणाले, मुळात हा पट्टा 1.7 कि.मी. इतका असून, 3.92 कोटी खर्च कसा? असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना नगराध्यक्षांनी सांगितले, सध्या जीएसआर व जीएसटीचे दर वाढले असून अंदाजी किंमत वाढली आहे.

याशिवाय फुटपाथ उभारताना गटारांचे बांधकाम तसेच अतिक्रमण हे सगळे विषय हाताळले जातील. हा खर्च अंदाज तांत्रिक विभागाकडे पाठविला जाणार आहे.

Mapusa Municipal Council | Goa News
CM Sawant Big announcement: साळगावात उभारणार आशियातील सर्वात्तम घनकचरा प्रकल्प

दोन वॉर्डांना लाभ

  • या फुटपाथचे काम प्रभाग 7 व प्रभाग 11मध्ये येणार असून या कामांचा प्रामुख्याने फायदा या दोन वॉर्डांना होईल.

  • विशेष अनुदानातून हे फुटपाथचे काम हाती घेणार, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी मंडळास दिले. परंतु, नेमके कुठले अनुदान हे सांगितले नाही.

  • नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर म्हणाले, आपल्या प्रभागात अशाच प्रकारची दोन कामे येताहेत. मात्र, या फुटपाथच्या कामासाठी 3.92 कोटी खर्च आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com