Sanjay Barde: ‘मोटोक्रॉस’साठी परवानगी कोणी दिली?

Sanjay Barde: शेतजमिनीत मातीचा भराव; रायडरच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी गरजेची
NCP Leader Sanjay Barde |Goa News
NCP Leader Sanjay Barde |Goa News Dainik Gomantak

Sanjay Barde: येथे आयोजित एमआरएफ मोटोग्रीप सुपरक्रॉस अ‍ॅक्शन चॅम्पियनशीप स्पर्धेत एका 20 वर्षीय रायडरचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, जेथे ही स्पर्धा भरविली, ती जागा योग्‍य होती का? मुळात शेतात मातीचा भराव टाकून ही स्पर्धा भरविण्यास परवानगी कोणी दिली?

असे सवाल उपस्‍थित करून या संपूर्ण प्रकरणाची पोलिस चौकशी होऊन दोषींवर गुन्हा नोंदविला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी केली.येथील पक्ष कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत बर्डे बोलत होते. यावेळी नगरसेवक तथा म्हापसा गट निमंत्रक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर व सीतेश मोरे उपस्‍थित होते.

बर्डे म्हणाले की, मुळात शेतजमिनीत कुणीही माती टाकल्यास भरारी पथक किंवा प्रशासकीय यंत्रणा कारवाई करते. मात्र, इथे कायद्याची पायमल्ली करुन शेतात स्पर्धा भरविली जाते. या स्पर्धेत एका युवकाचा जीव गेला आहे. याबाबत आम्हाला राजकारण करायचे नाही.

पण शेतात अशा प्रकारच्‍या स्पर्धा भरविण्यास कशी परवानगी मिळू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुळात मैदानावर सुरक्षा मानदंडाचे पालन करूनच स्पर्धा भरविली पाहिजे. परंतु अशा प्रकारे शेतात स्पर्धा भरविणे अयोग्य आहे. या स्पर्धेस कुठल्या प्रशासकीय यंत्रणांनी परवानगी दिली? जे कृत्रिम रेस ट्रॅक बनविले होते, ते सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून योग्य होते का?

याची कोणी तपासली केली होती का? असे सवाल बर्डे यांनी उपस्‍थित केले. तसेच अशा घटनांमुळे गोव्याची नाहक बदनामी होते, याकडेही त्‍यांनी लक्ष वेधले.

NCP Leader Sanjay Barde |Goa News
53rd IFFI Goa: यंदाचा 'इफ्फी' ठरणार अविस्मरणीय

स्‍पर्धा कायदेशीर होती का? पोलिसांनी का केला नाही हस्‍तक्षेप?

  • पालिका शेतात फक्त पंडाल उभारून प्रदर्शन भरविण्यास परवानगी देते. मात्र, हा इव्हेंट तशा प्रकारचा नव्हता. या स्पर्धेस उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून खरोखरच परवानगी मिळाली होती आणि पालिकेने आयोजकांचे सर्व एनओसी तपासून परवानगी दिली होती का, हे तपासावे लागेल.

  • जर स्पर्धा आयोजनासाठी कायदेशीर परवाने नव्हते तर पोलिसांनी ही स्पर्धा थांबविली का नाही? असा सवाल अ‍ॅड. शशांक नार्वेकर यांनी उपस्‍थित केला. कायद्याचे पालन न करताच इव्हेंटला परवानगी मिळते, तेव्हा असे परिणाम भोगावे लागतात. विशेष म्‍हणजे या स्पर्धेच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधीही उपस्थित होते, ही खेदाची बाब असल्याचे नार्वेकर म्हणाले.

"शेतात माती टाकण्यास म्हापसा पालिका परवानगी कशी देऊ शकते? पालिकेचे काम असते लोकांना मूलभूत सुविधा पुरविणे. अशा प्रकारे शेतजमिनीत बेकायदेशी स्‍पर्धा भरविणे योग्‍य नाही. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी."

- संजय बर्डे, काँग्रेसचे प्रवक्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com