Goa News: पदवीधर युवकाचा ‘टॅक्सी’ प्रवास सुरू

Goa News: आत्मनिर्भरतेचा संदेश : सागर दिवकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
Taxi Deriver | Goa News
Taxi Deriver | Goa News Dainik Gomantak

Goa News: आजच्या काळात युवा पिढी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी किंवा उच्च पदावरील खाजगी आस्थापनात नोकरी शोधत असतो. पण स्वतःच्या पायावर व्यवसाय करून उभे राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा पिढी पाहत नाही.

कला शाखेत पदवी संपादन केलेले. खोबोवाडो-कळंगुट येथील सागर चंद्रकांत दिवकर या तरुणाने वयाच्या 25 व्या वर्षी स्वतःची ट्रॅक्सी विकत घेऊन स्वालंबी होण्यासाठी मनात जिद्द धरून 25 वर्षे या टॅक्सी व्यवसायात मेहनत घेत ते कार्यरत आहेत.

1990 मध्ये म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेजमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली त्यानंतर कळंगुट येथील एका हॉटेलात नोकरी मिळवली. त्यालाच जोडून टॅक्सी त्यांनी खरेदी केली व टॅक्सी चालविण्यासाठी ड्रायव्हर ठेवला. एक वर्षामध्ये या व्यवसायात फायदा न मिळाल्यामुळे स्वतःच टॅक्सी चालविण्यास सुरुवात केली.

गोवा म्हणजे समुद्र किनारे असे समीकरण झाल्यामुळे कळंगुट हा भाग समुद्र किनाऱ्यामुळे जगात प्रसिद्ध आहे. या भागात अनेक देश व विदेशातले पर्यटक मोठ्या संख्येने येतात. अशा पर्यटकांना आपल्या टॅक्सीकडे वळविण्यासाठी प्रामाणिकपणा व मेहनत करण्याची गरज लक्षात घेऊन सागर दिवकर यांनी व्यवसायाला सुरुवात केली व स्वतः आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला.

Taxi Deriver | Goa News
Damodar Mauzo : लेखकाला अंतर्मनाची ओळख व्हायला हवी

उत्कृष्ट भजन कलाकार

सागर दिवकर आपला टॅक्सी व्यवसाय चालवत असताना त्यांनी संगीताचे धडे घेतले. व्यवसायातून मिळणाऱ्या वेळेत तो मंदिरातील भजन मैफलीत बसतो. मधुर आवाजात तो गायन सादर करतो. त्यामुळे तो एक कळंगुट भागात उत्कृष्ट भजनी कलाकार आहे.

सेवा देण्याचा संकल्प

दिवकर म्हणाले, गेली 25 वर्षेमध्ये टॅक्सी चालवत असताना वेळेचे भान ठेवले नाही. कुठल्याही वेळी पर्यटकांबरोबर सेवा देण्याचा संकल्प केला. या व्यवसायामुळे वेळ, काळ न बघता सेवा देत द्यावी लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com