Goa News: अँथोनी बार्बोजा वंचित समाजाचे दुःख जाणणारे नेते- सदानंद तानावडे

Goa News: बार्बोजा यांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे, असेही तानावडे म्हणाले.
Goa News | Sadanand Shet Tanavade
Goa News | Sadanand Shet TanavadeDainik Gomantak

Goa News: कुडतरी येथील भाजप एसटी समाजाचे नेते अँथनी बार्बोजा हे सामन्यांची दुःखे जाणणारे नेते असून वंचित समाजाला आधार देणे हेच आपले कर्तव्य मानून आजपर्यंत त्यांनी आपले काम केले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले.

अँथनी बार्बोजा यांच्या वाढदिवसानिमित्त कुडतरी येथील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तानावडे बोलत होते. बार्बोजा यांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे, असेही ते म्हणाले.

Goa News | Sadanand Shet Tanavade
Goa News: गोव्यात सरस्वतीचा संचार थांबविणाऱ्यांना बेताळच पाहून घेईल- देवदत्त पटनायक

यावेळी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, माजी खासदार नरेंद्र सावाईकर, माजी आमदार दामू नाईक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर तसेच अन्य नेते उपस्थित होते. चर्चिल आलेमाव म्हणाले, बार्बोजा एक धडपडे व्यक्तिमत्व असून त्यांनी आपली समाजसेवा चालूच ठेवावी. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com