P S Sreedharan Pillai: गोव्यातील आनंदाचा निर्देशांक कधी वाढणार?

P S Sreedharan Pillai: मडगाव दौऱ्यात घातला मुख्य मुद्द्याला हात
Goa Governor | Sreedharan Pillai
Goa Governor | Sreedharan PillaiDainik Gomantak

P S Sreedharan Pillai: संपूर्ण गोव्याची भ्रमंती करून गोव्याचे समाजमन जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या मडगाव दौऱ्यादरम्यान एका महत्त्वाच्या मुद्‌द्याला हात घालताना, गोवा दरडोई उत्पन्नात देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मात्र, हे राज्य आनंद निर्देशांकात (हॅप्पिनेस इंडेक्स) मागे असण्याचे कारण काय? असा सर्वांना अंतर्मुख करणारा प्रश्न उपस्थित केला.

आज राज्यपाल पिल्लई यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या दामोदर सालाला तसेच नावेली येथील रोजरी चर्चला भेट दिली. या दोन्हीं वास्तूंचे दर्शन घेतल्यावर आपण भारावून गेलो. आपण सध्या संपूर्ण गोव्यात फिरून लोकमानस जाणून घेत आहे. गोव्याचे लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्याही आनंद निर्देशांकात वाढ होण्याची गरज आहे, असे सांगितले.

आज मडगाव येथे दामोदर सालाला भेट देताना त्यांच्याबरोबर मडगावचे आमदार दिगंबर कामत तर नावेली चर्चला भेट देताना आमदार उल्हास तुयेकर हे उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी नावेली पंचायत सभागृहात जिल्हा पंचायत सदस्य व पंचायत सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

राज्यपाल पिल्लई यांच्या संपूर्ण राज्य दर्शन मोहिमेचा शेवटचा टप्पा उद्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात होणार, असे त्यांनी सांगितले. या पंधरा महिन्यांच्या दौऱ्यात मी फक्त गोवा जाणून घेतला नाही तर गोव्यातील जनमानसाचाही कानोसा घेतला.

यावर लगेच आपले पुस्तकही निघेल, असे साहित्यिक असलेले राज्यपाल पिल्लई यांनी यावेळी घोषित केले. नावेली येथे झालेल्या कार्यक्रमात काही संस्थांना तसेच कॅन्सर आणि किडनी पीडित रुग्णांना राज्यपालांनी आर्थिक मदत केली.

Goa Governor | Sreedharan Pillai
President Droupadi Murmu: 79 देश आणि 280 चित्रपट,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा इफ्फीसाठी खास संदेश

मिझोराम आनंदी राज्य

मिझोरामसारख्या राज्यात लोक भुकेने मरतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी आनंद निर्देशांकाचे सर्वेक्षण झाले त्यावेळी या निर्देशांकात हे राज्य पहिल्या क्रमांकावर होते. गोव्यातील लोकांना कसे आनंदित ठेवावे यावर विचार करण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. गोव्यात राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पिल्लई हे मिझोराम राज्याचे राज्यपाल होते.

आध्यात्मिक पर्यटनाची गरज

गोवा हे खासकरून समुद्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या पर्यटनात आता नैसर्गिक, आरोग्य आणि आध्यात्मिक पर्यटनाची जोड देण्याची गरज आहे. गोव्यात असे कित्येक गाव आहेत ज्यामध्ये हे पर्यटन वाढीस लावणे शक्य आहे. त्यातून या गावांचा सर्वतोपरी विकास होईल व बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे राज्यपाल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com