CM Pramod Sawant: गोव्यात क्रीडा विद्यापीठ होणार

CM Pramod Sawant: बोरकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
CM Pramod Sawant |Goa News
CM Pramod Sawant |Goa NewsDainik Gomantak

CM Pramod Sawant: गोव्यात खऱ्या अर्थाने क्रीडा प्रसार व्हावा आणि क्रीडा संस्कृती रुजावी, यासाठी गोव्यात लवकरात क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

दैनिक ‘गोमन्तक’चे प्रतिनिधी मंगेश बोरकर यांच्या ‘खेळांगण’ आणि ‘फुटबॉलच्या भूमीत’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी सावंत यांनी ही माहिती दिली. त्यावेळी आमदार दिगंबर कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर, गोमंत कला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष लोटलीकर उपस्थित होते.

यावेळी लेखक बोरकर यांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. माजी खासदार सावईकर यांनी बोरकर यांच्या पत्रकारितेचे कौतुक करताना, त्यांनी आपल्या लेखणीतून खेळाडूंना उत्तेजन दिल्याने आज कित्येक खेळाडू पुढे आले आहेत.

यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या भक्ती कुलकर्णी यांच्यासह ब्रह्मानंद शंखवाळकर, अनुरा प्रभुदेसाई व युतिका सतरकर या खेळाडूंचा सत्कार केला.

‘फुटबॉलच्या भूमीत’ हे पुस्तक गोव्यातील फुटबॉल खेळाचा मागच्या 99 वर्षांच्या इतिहासाचा एक दस्तावेज म्हणावा लागेल, असे वामन प्रभू यांनी सांगितले. लेखक बोरकर म्हणाले, खेळातील आपली आवड हीच क्रीडा पत्रकारिता सुरू करण्याचे कारण ठरले आणि मागच्या तीस वर्षात आपल्याला जे अनुभव आले, ते या दोन्ही पुस्तकातून मांडले आहेत. सुभाष लोटलीकर यांनी स्वागत केले तर ज्योतेंद्र नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले.

CM Pramod Sawant |Goa News
Goa Transport : वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये; बेकायदा पार्क वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई

आमदार दिगंबर कामत म्हणाले, खेळाडूंनी राज्यातील सुविधांचा सर्वात चांगला उपयोग करून खेळाचा दर्जा वाढवण्याची गरज व्यक्त केली. आज क्रीडा क्षेत्र हे पूर्वीसारखे राहिलेले नसून आता या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी खेळाडूंनी परिश्रम घेण्याची गरज आहे.

अत्याधुनिक हॉकी मैदान

सावंत पुढे म्हणाले, गोव्यात उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असेल. खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळाले, यासाठीही तरतूद केली जाणार आहे. गोव्यात लवकरच अत्याधुनिक असे हॉकीचे मैदान उभारले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com