Goa:अखेर मुरगाव पालिकेने ती अतिक्रमणे हटविली

विक्रेते तेथे पुन्हा बस्तान मांडणार नाही यासंबंधी पालिकेने खबरदारी घ्यावी अशी मागणी काही वाहनचालकांनी केली.
Goa:अखेर मुरगाव पालिकेने ती अतिक्रमणे हटविली
अतिक्रमणे हटविताना व टेम्पोतून माल नेताना विक्रेते.Dainik Gomantak

दाबोळी: वरुणपुरी मांगोरहिल चौकात चौपदरी महामार्ग (highway) कडेला अतिक्रमण करून फळे, भाजी व इतर मालांची विक्री करणाऱ्या विरोधात गुरुवारी कारवाई करून मुरगाव पालिकेने (Municipality) ती अतिक्रमणे हटविली. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला (Transportation)मोठा अडथळा होऊन अपघात होण्याची भीती वास्को वाहतुक पोलिस विभागाने व्यक्त केली होती. ती अतिक्रमणे हटविण्यासंबंधी वास्को वाहतूक पोलिस विभागाने मुरगाव पालिकेला पत्र पाठविले होते. त्यानुसार पालिका निरीक्षक सॅबी परेरा यांनी गुरुवारी दुपारी सदर अतिक्रमणे हटविली.

वरुणपुरी-मांगोरहिल चौकातील महामार्गाच्या कडेला अतिक्रमणे करून काही महिलांनी फळ,भाजी व इतर वस्तूं विकण्यास आरंभ केला होता. हळूहळू त्या संख्येत भर पडून तेथे काहीजणांनी भजी, बटाटेवडे, फास्ट फूड, शहाळे विक्रीचे हातगाडे उभे केले. तर रस्त्याकडेला बसणारयांनी आपल्या जागांचा कक्षा रुंदावताना महामार्गावरील पार्किंग रेषेवरही अतिक्रमण केले.त्यामुळे तेथे लहान बाजार भरू लागला होता. फळे, भाजी व इतर वस्तूं मिळत असल्याने ती खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी वाहनांतील व्यक्ती उतरू लागल्या.

अतिक्रमणे हटविताना व टेम्पोतून माल नेताना विक्रेते.
Goa: नवरात्रोत्सव निमित्त '101 सामूहिक सत्यनारायण' पूजा संकल्प संपन्न

संबंधित आपली वाहने रस्त्यावर (Road) वाटेल तशी उभी करू लागल्याने तेथे इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागला होता. सदर ठिकाणी वळण असल्याने रस्त्यावरच उभी करण्यात येणारी वाहने दुसऱ्या वाहनचालकांच्या नजरेस पडत नव्हती.त्यामुळे अपघाताही सामोरे जावे लागले होते. तेथे मोठा अपघात घडण्यापूर्वी ती अतिक्रमणे हटविण्यासंबंधी वास्को वाहतूक पोलिस विभागाने मुरगाव पालिकेला तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेताना ती अतिक्रमणे (Encroachments) हटविण्यात आली. तेथील फळे, भाजी व इतर वस्तूं तेथून नेण्याची सूचना करण्यात आल्यावर काहीजणांनी टेम्पोतून ती नेली.परंतू एक दोघांनी आपला माल तेथेच ठेवला होता. ती अतिक्रमणे हटविण्यात आल्याबद्दल वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.सदर विक्रेते तेथे पुन्हा बस्तान मांडणार नाही यासंबंधी पालिकेने खबरदारी घ्यावी अशी मागणी काही वाहनचालकांनी केली.

Related Stories

No stories found.