झेंडूच्या फुलांनी बहरला बाजार

झेंडू फुल लागवडीकडे कृषी खात्याने पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिले नसल्याने नवरात्रोत्सव काळात लाखो रूपये किमंतीच्या झेंडूच्या फुलांची विक्री शहरांच्या नाक्या नाक्यावर सुरू झाली आहे.
झेंडूच्या फुलांनी बहरला बाजार
कृषी खात्याच्या नाकावर टिच्चून राज्यात परगावच्या झेंडूची नवरात्रोत्सव काळात विक्री.Dainik Gomantak

काणकोण: कृषी खात्याच्या नाकावर टिच्चून राज्यात परगावच्या झेंडूची (Marigold Flowers) नवरात्रोत्सव काळात विक्री करण्यात येत आहे.एका बाजूला ऑर्कीड फुलांचा प्रयोग फसला मात्र या मातीचा गंध घेऊन फुलणाऱ्या झेंडू फुल लागवडीकडे कृषी खात्याने पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिले नसल्याने नवरात्रोत्सव काळात लाखो रूपये किमंतीच्या झेंडूच्या फुलांची विक्री शहरांच्या नाक्या नाक्यावर सुरू झाली आहे.

कृषी खात्याच्या नाकावर टिच्चून राज्यात परगावच्या झेंडूची नवरात्रोत्सव काळात विक्री.
अमित शहांच्या दौर्‍यामुळे गोव्यातील खड्डे दुरुस्तीला लागला मुहूर्त

तीस ते चाळीस रूपये मीटर दरांत झेंडूच्या फुलांच्या माळाची विक्री कर्नाटकाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले विक्रेते करू लागले आहेत. राज्यात मिरची शेतीत झेंडू फुलांची परंपरेने लागवड करण्यात येते.मात्र व्यापारी तत्वावर मोजकेच शेतकरी व्यापारी तत्वावर झेंडू फुलांची लागवड करतात.नवरात्रोत्सव ते दिपावलीत लक्ष्मी पूजना पर्यंत या फुलांना मागणी असते.

कृषी खात्याच्या नाकावर टिच्चून राज्यात परगावच्या झेंडूची नवरात्रोत्सव काळात विक्री.
अन्यथा यंत्रसामग्री जप्त करू

यंदाच्या वर्षी फुलांच्या किंमतीत कमालीची वाढ

दसरा उत्सवानिमित्त झेडुच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली असून, या परराज्यातील विविध विक्रेते झेडुच्या फुलांची विक्री करणारी दुकानें थाटली आहेत, यावर्षी 100 रूपये किलो, 60 रूपये फुलांची माळ असा भाव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागात गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली खाण बंदी आणि कोव्हीड 19 मुळे ठप्प झालेले सर्व व्यवहार व यातून निर्माण झालेली आर्थिक अडचण सहन करून नागरिकांना चढ्या भावाने फुले खरेदी करावी लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com