गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वरूणराजही लावणार हजेरी..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी गोव्यात हलक्या सरी कोसळतील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.   

पणजी- गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी गोव्यात हलक्या सरी कोसळतील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.   

पावसाच्या हलक्या सरींमुळे राज्यात गारठा पडण्याचीही शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. २०२१च्या सुरूवातीलाच १, २ आणि ३ तारखेला हवामान कोरडे असेल. तसेच राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा परिसरात तापमानात कोणताही बदल होणार नसल्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण आणि उत्तर गोवा परिसरात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस असेल, अशी शक्यता वर्तवताना पणजी आणि मडगाव येथे कोणताही तापमान बदल दिसून येणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.   

संबंधित बातम्या