Goa Diwali Festival: मयेत शेतकऱ्यांकडून परंपरेचे 'वण्यार' परिसरात जतन

Goa Diwali Festival: काळ बदलत चाललाय, तसे काळाच्या ओघात काही पारंपरिक रीतीरिवाज पडद्याआड होत आहेत.
Goa Farmers | Diwali Festival
Goa Farmers | Diwali FestivalDainik Gomantak

Goa Diwali Festival: काळ बदलत चाललाय, तसे काळाच्या ओघात काही पारंपरिक रीतीरिवाज पडद्याआड होत आहेत. दिवाळी काळात बलिप्रतिपदा अर्थातच गोधन (गुरांचा) पाडवा साजरा करण्यात येत असला, तरी काही भागात या सणातील काही परंपरागत चालत आलेल्या प्रथा बंद पडल्या आहेत.

माळरानावरील पारंपरिक जागेत बसून पोळे (भाकरी) आणि चटणीचा आस्वाद घेण्याची गुरांच्या पाडव्यातील पूर्वापार परंपरा मये सारख्या ठिकााणी पाळली जाते. पोळ्यांचा पाडवा बलिप्रतिपदेदिनी साजरा करण्यात येणारा गुरांच्या पाडव्याला पोळ्यांचा पाडवा म्हणूनही ओळखण्यात येते.

Goa Farmers | Diwali Festival
Goa News: मुरगाव नरकासुर वध स्पर्धेचे बक्षीस वितरण

एक काळ असा होता, की पाडव्यादिवशी गोठ्यात गुरांची पूजा केल्यानंतर गुराखी अर्थातच शेतकरी घरात भाजलेले पोळे, चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन रानात जायचे. नंतर त्याठिकाणी पारंपरिक जागेत एकत्रित बसून आंबट-तिखट चटणीसह पोळ्यांचा आस्वाद घेत असे. बदलत्या काळानुसार बहुतेक भागात ही परंपरा कालबाह्य होत असतानाच, डिचोली तालुक्यातील मये गावात ही परंपरा आजही टिकून आहे.

वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही काल बुधवारी गुरांच्या पाडव्यातील ही परंपरा जोपासताना मये गावातील केळबायवाडा, कुंभारवाडा आदी भागातील शेतकरी सकाळी पोळे आणि चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन ''वण्यार'' येथील माळरानावर गेले. त्याठिकाणी सर्वांनी एकत्रित बसून पोळे, चिकन आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पाडव्याचा आनंद द्विगुणित केला.

Goa Farmers | Diwali Festival
Goa News: पेडणेत भात खरेदीचा गोंधळ!

दामोदर गोसावी, ज्येष्ठ नागरिक, मये-

गुरांच्या पाडव्या दिवशी प्रत्येकजण ''गुराखी'' ही भावना बाळगून माळरानी जातात. ही परंपरा आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. आजही आम्ही ही परंपरा चालूच ठेवली आहे. लहान मुलेही मोठ्या उमेदीने सहभागी होत आहेत. त्यामुळे भविष्यातही ही परंपरा चालूच राहणार असल्याचा आशावाद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com