Goa Medical College: गोव्यात 46 रुग्णांना प्रतीक्षा अवयव दानाची; मृताच्या कुटूंबियांची संमती ठरते महत्वाची...

अवयवदानासाठी पुढे येण्याची गरज
Goa Needs Organ Donor:
Goa Needs Organ Donor:Dainik Gomantak

Goa Needs Organ Donor: बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमॅको) मध्ये नुकत्याच 25 वर्षीय ब्रेन डेड तरुणाचे अवयव दान केल्याने चार जणांना जीवदान मिळाले. दरम्यान, गोव्यात असे अवयव दानाच्या प्रतीक्षेत असलेले एकूण 46 रुग्ण असल्याची माहिती आहे.

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान केल्यास अशा प्रतीक्षेत असलेल्या रूग्णांना त्यांना हवा असलेला अवयव मिळून त्यांच्यावर शस्रक्रिया करता येऊ शकते. आणि त्यातून त्यांनाही नवे जीवन मिळण्याची शक्यता आहे.

गोव्यातील State Organ and Tissue Transplant Organization (SOTTO) च्या जॉईंट डायरेक्टर डॉ. प्रीती वर्गीस यांनी ही माहिती दिली आहे.

त्या म्हणाल्या की, गोव्यातील केवळ 46 रूग्णांनाच अवयवाची प्रतीक्षा आहे असे नाही तर असे अनेक रुग्ण आहेत जे डायलिसिसवर आहेत आणि त्यांनाही अवयवांची गरज आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येण्याची गरज आहे.

दरम्यान, देशभरातील 950 लोकांनी SOTTO गोवाला अवयवदानाचे वचन दिले आहे. ब्रेन डेड रुग्णांच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय अवयव दान करता येत नाही.

Goa Needs Organ Donor:
Goa Hospitality Institute: गोव्यात होणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण संस्था; पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रम...

गोव्यातील स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत चार ब्रेन डेड व्यक्तींनी गेल्या चार वर्षांत इतर व्यक्तींना नवीन जीवन दिल्याची माहिती आहे. चार देणगीदारांपैकी एक गोव्यातील तर इतर शेजारील राज्यांतील आहेत.

गोमॅकोमधील नुकत्याच झालेल्या तरूणाच्या ब्रेन डेड नंतर त्याची एक किडनी गोमॅकोमधील 31 वर्षीय रुग्णाला दिली गेली तर दुसरी किडनी हेल्थवे हॉस्पिटलमधील 45 वर्षीय रुग्णाला दिली गेली. तर चेन्नईतील MGM येथील 30 वर्षीय रुग्णाला हृदय दिले गेले आणि दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटल R & R ला यकृत दिले गेले होते.

गोव्यात State Organ and Tissue Transplant Organization (SOTTO) च्या स्थापनेनंतर पहिले अवयव प्रत्यारोपण 2020 या वर्षामध्ये GMC मध्ये आणि दुसरे सन 2021 मध्ये झाले होते. तर SOTTO स्थापनेपूर्वी मणिपाल रुग्णालयात एक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रीया झाली होती.

प्रतीक्षा यादीनुसार शासकीय रुग्णालयांमध्ये अवयवदान झाल्यास प्रथम प्राधान्य शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दिले जाते आणि प्रतीक्षा यादीत कोणीही नसल्यास खासगी रुग्णालयांना अवयवदान केले जाते.

Goa Needs Organ Donor:
ख्रिश्चनधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'गोवा टुर'; 'या' राज्य सरकारने घेतला निर्णय

किती काळात प्रत्यारोपण करावे लागते?

अवयव दान केल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्याचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. तथापि, हृदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण चार ते सहा तासांत आणि किडनीचे (मूत्रपिंड) 24 तास ते 48 तासांत प्रत्यारोपित केली जाऊ शकते. तथापि, कोणीही इतकी वाट पाहत नाही.

कारण अवयव जितका शरीराबाहेर राहिल तितकाच रक्तपुरवठा आणि पेशींच्या कार्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. यकृत, स्वादुपिंड आणि लहान आतडे 12 तासांत करावे लागतात, असेही डॉक्टर सांगतात.

गोमॅकोमध्ये किडनी प्रत्यारोपण मोफत

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये किडनी प्रत्यारोपण पूर्णपणे मोफत आहे. प्रत्यारोपणावर झालेल्या खर्चाचा काही भाग DDSS योजनेतूनदेखील कव्हर केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com