गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून ऑक्सिजन सिलिंडर पुरवणाऱ्या कार्यकर्त्यांची फसवणूक: गिरीश चोडणकर

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन भंडारी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर आदींना आगशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णांना वैद्यकीय प्राणवायूचे सिलिंडर पुरवणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. रुग्णांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरत असल्यामुळेच स्वयंसेवी संस्था आणि इतरांना मदत करण्यासाठी पुढे यावे लागत आहे अशी टीका त्यांनी केली आहे. (Goa Medical College is cheating workers supplying oxygen cylinders: Girish Chodankar) 

45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी  1 लाखाहून अधिक डोस उपलब्ध: डॉ. प्रमोद...

गिरीश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन भंडारी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर आदींना आगशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ हे आगशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. काँग्रेसचे हे नेते कालपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णांना वैद्यकीय प्राणवायू चे सिलेंडर पुरवण्याच्या कामात मदत करत होते.

पेडणे तालुक्यात आजपासून सहा दिवस वीजपुरवठा खंडित 

गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यानी असले खालच्या पातळीवरील राजकारण करण्यापेक्षा स्वतः डॉक्टर या नात्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्ण सेवा करण्यासाठी रुजू व्हावे असा सल्ला दिला आहे.

 

संबंधित बातम्या